VIDEO: विधानसभेतही जागावाटपाचा तिढा, भाजप 160-170 जागा लढणार? शिंदे-पवार गटाच्या मनसुब्यांना सुरुंग?

Assembly Elections Mahayuti Seat Sharing News : विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागलेत. सर्वच पक्ष तयारीला लागलेत. अशात राज्यात मोठा भाऊ असलेल्या भाजपनं विधानसभेसाठी 160-170 जागा लढण्याची तयारी केल्याची माहिती सुत्रांनी दिलीये. तर उर्वरीत जागा शिंदे अजित पवारांसह मित्रपक्षांमध्ये विभागल्या जातील अशी शक्यता आहे.
विधानसभेतही जागावाटपाचा तिढा, भाजप 160-170 जागा लढणार? शिंदे-पवार गटाच्या मनसुब्यांना सुरुंग?
Devendra Fadnavis, ajit pawar and eknath shindeSaam TV
Published On

लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपची कामगिरी अतिशय सुमार ठरली. त्या तुलनेत महायुतीतील शिंदे गटाचा स्ट्राईकरेट चांगला होता. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेसाठी अधिक जागांची आग्रही मागणी करण्याची शक्यता असतानाच भाजपकडून 150 प्लस जागांची मागणी होत असल्याचं दिसतंय. त्यामुळे जागावाटपाचा तिढा वाढण्याची शक्यताय. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत बोलताना सांगितलं आहे की, अजून काहीही चर्चा झाली.

शिंदे गटाकडून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे 100 जागांची मागणी करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. ही मागणी मान्य झाल्यास भाजपला 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील जागांपेक्षाही कमी जागा लढवाव्या लागतील. 2019 च्या निवडणुकीत भाजपनं 152 जागा लढवल्या होत्या तर तत्कालीन शिवसेनेनं 124 आणि इतर मित्रपक्षांना 12 जागा देण्यात आल्या होत्या.राज्याच्या राजकारणात झालेले बदल पाहता युतीतील जागावाटपाचं सुत्रही बदलणार आहे

विधानसभेतही जागावाटपाचा तिढा, भाजप 160-170 जागा लढणार? शिंदे-पवार गटाच्या मनसुब्यांना सुरुंग?
Anant-Radhika Guest List: जॉन सीना, किम कार्दिशियन; अंबानींच्या लग्नाला VIP आणि VVIP वऱ्हाड; पाहा लिस्ट

जागावाटपाचा तिढा?

विधानसभा निवडणुकीत महायुतीतील भाजपने 160-170, शिंदे गटाने सुमारे 70 उर्वरित 58 जागा अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांना दिल्या जाव्यात असेही प्रदेश भाजपमधील नेत्यांनी सुचवले असल्याचा दावा सूत्रांनी केला.

सध्या महायुतीमध्ये भाजपचं मोठा भाऊ असल्यानं भाजप झुकतं माप घेणार नाही हे तर उघड आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा देण्यात आल्या होत्या.

विधानसभेतही जागावाटपाचा तिढा, भाजप 160-170 जागा लढणार? शिंदे-पवार गटाच्या मनसुब्यांना सुरुंग?
IAS Pooja Khedkar: पूजा खेडकर यांच्या भलत्याच 'डीमांड'; जॉइन होण्याआधीच हवी होती कार, समोर आले WhatsApp चॅट

मात्र, वाटणीला आलेल्या कमी जागांची भरपाई विधानसभा निवडणुकीत करण्याची अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जाहीरपणे व्यक्त केली होती. महायुतीला मराठा मतदारांकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादीची जागावाटपातील मागणीही भाजपला डावलता येणार नाही. त्यातून महायुतीतील जागावाटपाचा तिढा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com