Rain Alert : शेतकऱ्यांनो काळजी घ्या! राज्यात पुढील ५ दिवस अवकाळीसह गारपिटीचा इशारा; या जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Rain Updates : ऐन रब्बी हंगामाची पिके काढणीस आली असताना, राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसासह तुफान गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra Rain Latest News,
Maharashtra Rain Latest News, Saam Tv

Maharashtra Rain Updates : महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. ऐन रब्बी हंगामाची पिके काढणीस आली असताना, राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसासह तुफान गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात आजपासून म्हणजेच १५ ते १८ मार्च दरम्यान, गारपीटीसह अवकाळी पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Rain Latest News,
HSC Exam Paper Leak : बुलढाणा पेपर फुटी प्रकरणात मोठी अपडेट; अखेर मास्टर माईंड सापडलाच, SIT पथकाची कारवाई

महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. ऐन रब्बी हंगामाची पिके काढणीस आली असताना, राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसासह तुफान गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात आजपासून म्हणजेच १५ ते १८ मार्च दरम्यान, गारपीटीसह अवकाळी पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

आधीच शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव आणि त्यातच आता अवकाळी पावसाचं संकट यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. या महिन्यात आतापर्यंत दुसऱ्यांना शेतकऱ्यांना अवकाळीचा सामना करावा लागत आहे. यामुळे काढणीला आलेल्या पिकांचं तसेच द्राक्ष बागांचे मोठे नुकसान होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

हिमालयात पश्चिमी चक्रवात तयार झाल्याने त्या भागात बर्फवृष्टी सुरू झाली आहे. आसाममध्ये हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने तामिळनाडूपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या सर्वच भागांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा इशारा मंगळवारी पुन्हा देण्यात आला आहे.

Maharashtra Rain Latest News,
Breaking News : टेन्शन वाढलं! महाराष्ट्रात H3N2 चा पहिला बळी; अहमदनगरमधील संशयित रुग्णाचा मृत्यू

मराठवाड्यासह विदर्भात गारपीटीची शक्यता

नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर जिल्ह्यातील काही ठिकाणी गारपिटीसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जळगाव, नाशिक, औरंगाबाद आणि जालन्यात काही ठिकाणी गारपिट होण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र आयएमडीने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या दिवशी कोकणासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १७ मार्च रोजी जळगाव, अहमदनगर,पुणे, औरंगाबाद जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी, वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

तर १८ मार्च रोजी अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात देखील हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com