Chandwad Water Scarcity : चांदवड तालुक्यातील 70 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, एमजीपीवर नागरिकांचा राेष

आडगाव ते मंगरूळ फाटा दरम्यान नवीन डी. वाय. पाईपलाईन सुरु करण्याकरिता ४४ गाव पाणी पुरवठा योजनेचा पाणी पुरवठा १८ ते २१ जानेवारीपर्यंत बंद करण्यात आला हाेता.
water scarcity in chandwad citiznes blames maharashtra jeevan pradhikaran
water scarcity in chandwad citiznes blames maharashtra jeevan pradhikaran saam tv
Published On

- अजय सोनवणे

Nashik News :

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (maharashtra jeevan pradhikaran) अनियोजित कारभारामुळे गेल्या १५ ते २० दिवसांपासून नाशिकच्या चांदवड (chandwad) तालुक्यातील 70 गावांचा पुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. एमजीपीच्या अनागोंदी कारभारामुळे तालुक्यातील सरपंच संतापले असून ४४ गाव पाणी पुरवठा योजना तत्काळ सुरळीत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. (Maharashtra News)

चांदवड तालुक्यातील जवळपास ६० ते ७० गावांना ओझरखेड धरणातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ४४ गाव पाणी पुरवठा योजनेद्वारा नियमीत पाणी पुरवठा केला जातो. आडगाव ते मंगरूळ फाटा दरम्यान नवीन डी. वाय. पाईपलाईन सुरु करण्याकरिता ४४ गाव पाणी पुरवठा योजनेचा पाणी पुरवठा १८ ते २१ जानेवारीपर्यंत बंद करण्यात आला हाेता.

water scarcity in chandwad citiznes blames maharashtra jeevan pradhikaran
Dhule To Ayodhya MSRTC Bus : एसटी महामंडळाची धुळे ते अयाेध्या बस सेवा; जाणून घ्या तिकीट दर

त्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होणे अपेक्षीत होते. मात्र आजही पाणी पुरवठा ठप्पच आहे. एकीकडे दुष्काळी परिस्थिती आणि दूसरीकडे ४४ गाव पाणी पुरवठा योजनेद्वारा पाणी येत नसल्याने पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. नळाला पाणी येत नसल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

water scarcity in chandwad citiznes blames maharashtra jeevan pradhikaran
Leopard Trapped In Loni : नरभक्षक बिबट्यासाठी 16 पिंजरे, ड्राेन कॅमे-याची नजर; लाेणीत तीन बिबटे जेरबंद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com