मनोज जायस्वाल, साम टीव्ही
वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन मंदिरात सोमवारी (ता. १२) दोन पंथियांमध्ये पुन्हा वाद झाला. मंदिरातील बांधकामावरून श्वेतांबर आणि दिगांबर गटातील लोक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. वाद इतका विकोपाला गेला, की देवाच्या दारातच दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या हाणामारीत काहीजण जखमी झाले आहेत.
याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. जैन धर्मियांची काशी म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील (Washim News) शिरपूर जैन येथील भगवान पार्श्वनाथ यांच्या दोन गटात सातत्याने वाद होत आहेत. प्रशासनाने हा वाद मिटवावा, अशी मागणी गावातील नागरिक करीत आहेत.
सध्या अंतरीक्ष भगवान पार्श्वनाथ मूर्तीच्याजवळ श्वेतांबर पंथियांकडून ओट्याचं काम सुरू आहे. या ओट्याचं काम करीत असलेल्या कारागिरांकडून मूर्तीची विटंबना होत असल्याचा आरोप दिगांबर पंथियांकडून करण्यात आला. सोमवारी याच कारणावरून दोन्ही गट आमने सामने आले. यावेळी त्यांच्या शाब्दिक बाचाबाची झाली.
दिगंबर पंथियांकडून या बांधकामाला विरोध करण्यात आला. यावेळी दोन्ही गटातील लोकांमध्ये हाणामारी झाली. या मारहाणीत तात्या भैया जखमी झाले. दरम्यान, या मारहाणीचा व्हिडीओ समोर आला आहे. मारहाण करणारे लोक बाहेरची असल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.