

वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल.
९ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली
पोलिसांनी केलेल्या मारहाणीत आरोपीचा मृत्यू
१५ वर्षांनंतर पीडित कुटुंबाला न्याय मिळाला
वाशिममधील ९ पोलिसांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी कस्टडीमध्ये असलेल्या आरोपीला बेदम मारहाण केली होती या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात दोषी असलेल्या ९ पोलिसांना आज न्यायालयाने शिक्षा सुनावली. सर्वच्या सर्व पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावत वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला.
वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा ऐतिहासिक निकाल दिला आहे. रिसोड पोलिस ठाण्यामध्ये चोरीच्या गुन्ह्यात संशयित असलेला आरोपी बेग्या पवार याचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. बेग्या पवार याच्यावर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसल्याची त्याच्या आई-वडिलांची माहिती आहे. बेग्या पवार हा हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातल्या वाढोणा येथील पारधी समाजाचा होता. त्यांचा १० मे २०११ रोजी पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. तब्ब्ल १५ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला.
रिसोड पोलिस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार महादेव माणिक धांडे यांच्यासह पोलिस कर्मचारी मदन केशव पवार, शिवाजी नामदेव खिल्लारी, पंजाब माणिकराव पाटकर, रमेश सीताराम पवार, प्रकाश हिरालाल तारम, नागोराव भगवान खांडके, अशोक निवृत्ती वैद्य, वसंत कणिराम जाधव या ९ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात सी आय डी ने ३४ दिवस तपास करून हत्येच्या गुन्ह्यासह स्पेशल ऍट्रॉसिटीचाही गुन्हा पोलिसांवर दाखल केला होता. न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिल्यानंतर बेग्या पवार यांच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.