Washim Crime: गावातील महिलेवरच पडली वाईट नजर, लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; विरोध केल्याने निर्घृण हत्या

Washim Woman Killed Case: वाशिमच्या कारंजामध्ये एका महिलेवर दोघांनी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. महिलेने विरोध केला आणि गावातील लोकांना याची माहिती देईल असे सांगितले. त्यामुळे दोघांनी महिलेलाच संपवले.
Washim Crime: गावातील महिलेवरच पडली वाईट नजर, लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; विरोध केल्याने निर्घृण हत्या
Washim Crime News Saam Tv
Published On

मनोज जैस्वाल, वाशिम

वाशिमध्ये महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कारंजा तालुक्यातील खेर्डा जिरापुरे येथे ही घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. आरोपींनी महिलेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. महिलेने विरोध केल्यामुळे आरोपींनी तिची हत्या केल्याचे तपासातून उघड झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, वाशिमच्या कारंजा तालुक्यातील खेर्डा जिरापुरे येथे ३ जानेवारीला सोनू लवलेश कोडापे या महिलेची निघृण हत्या करण्यात आली होती. या महिलेची हत्या करणाऱ्या २ आरोपींना कारंजा पोलिसांनी अटक केली आहे. संदीप गायकवाड आणि किशोर ऊर्फ बाबू कोवे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. या आरोपींनी महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. त्या महिलेने विरोध करून गावात तक्रार करण्याची धमकी आरोपींना दिली. त्यामुळे आरोपींनी धारदार विळ्याने तिची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली.

Washim Crime: गावातील महिलेवरच पडली वाईट नजर, लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; विरोध केल्याने निर्घृण हत्या
Pune Crime: खळबळजनक! दारूसाठी पैसे न दिल्याचा राग, तरुणाने जिवलग मित्रालाच संपवलं

३ जानेवारी रोजी महिलेचा मृतदेह गावालगतच्या जंगलामध्ये आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला होता. महिलेचा मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी तपास सुरू केला होता. याप्रकरणी कारंजा पोलिसांनी तपासचक्र फिरवले. गावातील रहिवासी संदीप गायकवाड हा व्यक्ती घटना घडल्यापासून बेपत्ता असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.crime

Washim Crime: गावातील महिलेवरच पडली वाईट नजर, लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; विरोध केल्याने निर्घृण हत्या
Nashik Crime : एमबीए झालेल्या महिलेने केली बाळाची चोरी, कारण ऐकून पोलीसही चक्रावले

पोलिसांनी या संशयित आरोपीचा शोध सुरू केला असता तो मुंबईला फरार होण्याच्या मार्गावर होता. तेवढ्यात संदीप गायकवाडला पोलिसांनी बुलडाणाच्या नांदुरा रेल्वे स्टेशनच्या बाहेरून ताब्यात घेतलं. संदीप गायकवाडची पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसंच साथीदार किशोर कोवेचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे उघड झाले. सध्या दोन्ही आरोपींना कारंजा पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Washim Crime: गावातील महिलेवरच पडली वाईट नजर, लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; विरोध केल्याने निर्घृण हत्या
Kolhapur Crime : एसबीआयच्या एटीएमवर दरोडा, १८ लाखांची रोकड लंपास, कोल्हापूर पोलीस आणि दरोडेखोरांत थरार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com