Washim Accident: वाशिममध्ये ट्रक आणि रुग्णवाहिकेचा भीषण अपघात! डॉक्टरचा जागीच मृत्यू; चालक जखमी

Maharashtra Accident News: दुर्दैवी अपघातात ॲम्बुलन्समधील डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघातातील जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Beed Accident
Washim AccidentSaam tv

मनोज जयस्वाल, वाशिम, ता. २३ मे २०२४

वाशीम जिल्ह्यातील धोतरा जहागीर गावाजवळ ट्रक आणि 108 रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्दैवी अपघातात ॲम्बुलन्समधील डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघातातील जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाशीम जिल्ह्यातील धोतरा जहागीर गावाजवळ ट्रक आणि 108 रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. कारंजा येथील रुग्ण अमरावतीला सोडून परत येत असताना नादुरुस्त असलेल्या ट्रकला ॲम्बुलन्सने धडक दिली. या दुर्दैवी अपघातात ॲम्बुलन्समधील डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला असून ॲम्बुलन्स चालक गंभीर जखमी झालेत.

गोंदियात भीषण अपघात, तरुणाचा मृत्यू

गोंदियात मालवाहू ट्रकने स्थानिक गुन्हे शाखेच्या वाहनाला मागून धडक दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या गाडीचा नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर समोर उभे असलेल्या चार तरुणांना धडक दिली. या अपघातात साहिल कुडमेते या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. गोंदिया शहरातील एका कंपनीत जॉब करत असून मुळचा चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. या अपघतात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे आणी वाहन चालक मुरली पांडे हे जखमी आहेत.

Beed Accident
MLA P. N. Patil Death : काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला; आमदार पी. एन. पाटील यांचं निधन

मुंबई, पुणे एक्सप्रेवर भीषण अपघात

दरम्यान, मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर मध्यरात्री भाताण बोगद्याजवळ दोन कारमध्ये झालेल्या अपघातात तीन प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून जखमींना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे.

Beed Accident
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज पुन्हा ट्रॅफिक ब्लॉक; 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com