MLA P. N. Patil Passed Away
MLA P. N. Patil Passed AwaySaam TV

MLA P. N. Patil Death : काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला; आमदार पी. एन. पाटील यांचं निधन

MLA P. N. Patil Passed Away : काँग्रेसचे करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार. पी. एन. पाटील यांचं दुखद निधन झालं आहे. आज गुरुवारी पहाटे वयाच्या ७१ व्या वर्षी पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

काँग्रेसचे करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार. पी. एन. पाटील यांचं दुखद निधन झालं आहे. आज गुरुवारी पहाटे वयाच्या ७१ व्या वर्षी पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. बाथरुममध्ये पाय घसरून पडल्यानंतर गेल्या ४ दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

MLA P. N. Patil Passed Away
Hingoli News: हिंगोलीच्या भूमिपुत्राला सिक्कीम राज्यात वीरमरण

आमदार पी. एन पाटील हे गांधी घराण्याचे अत्यंत विश्वासू शिलेदार होते. स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसची धुरा त्यांनी अत्यंत जबाबदारीने सांभाळली.

कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी पी. एन. पाटील यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र, वय आणि प्रकृती लक्षात घेत त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. त्यामुळे काँग्रेसने शाहू महाराज यांना उमेदवारी दिली. शाहू महाराजांचा प्रचार करण्यासाठी एन. पी पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता.

मतदानाच्या आधीच त्यांना थकवा जाणवत होता. यामुळे काही दिवस ते घरातच थांबून होते. त्यातच पाटील यांना रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. गेल्या शनिवारी रात्री डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावली होती. रविवारी सकाळी पाटील हे बाथरुममध्ये चक्कर येऊन पडले.

त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पी. एन पाटील यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ते रुग्णालयात दाखल झाल्याचं समजताच जिल्ह्यातील कानाकोपर्‍यातून काँग्रेस कार्यकर्ते रुग्णालयाच्या आवारात दाखल झाले.

यामुळे रुग्णालयाच्या आवारात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. आमदार पाटील यांची तब्येत कशी आहे, यांची विचारणा कार्यकर्ते करत होते. मात्र, उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

जिल्हा काँग्रेसकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आमदार पी. एन. पाटील यांचे पार्थिव आज सकाळी १० वाजता जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये अंत्यदर्शन ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता त्यांचे पार्थिव मुळ गावी सडोली खालसामध्ये नेण्यात येणार आहे. तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

MLA P. N. Patil Passed Away
Maharashtra Lok Sabha: महाराष्ट्रात जागा कमी, तरी सत्तेची हमी; प्रशांत किशोर यांनी केली मोठी भविष्यवाणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com