Wardha : वर्ध्यात ३ ते ४ किलोची भलीमोठी गार पडली; तज्ज्ञांच्या तपासणीत धक्कादायक निष्कर्ष

wardha Farmer : वर्ध्यातील हमदापुर गावात ३ ते ४ किलो वजनाची गार पडल्याची चर्चा रंगली. मात्र आकाश निरीक्षण मंडळाच्या तपासणीत गार आकाशातून पडलेली नसल्याचे स्पष्ट झाले.
Wardha : वर्ध्यात ३ ते ४ किलोची भलीमोठी गार पडली; तज्ज्ञांच्या तपासणीत धक्कादायक निष्कर्ष
Wardha NewsSaam Tv
Published On
Summary
  • हमदापुर गावात ३ ते ४ किलो वजनाची गार पडल्याची चर्चा रंगली.

  • अंबादास वासनिक यांच्या शेतासमोर हा प्रकार घडल्याचे सांगितले गेले.

  • तज्ज्ञांच्या तपासणीत गार आकाशातून पडली नसल्याचे निष्कर्ष.

  • गावात या घटनेमुळे चर्चेला आणि कुतूहलाला उधाण.

वर्ध्याच्या हमदापुर गावात अक्षरशः आभाळतून तीन ते चार किलो वजनाची गार कोसळली असल्याची गावाकऱ्यांची चर्चा आहे. तुम्ही बरोबर ऐकलंत ३ ते ४ किलो वजनाची भलीमोठी गार अंबादास वासनिक यांच्या शेतातील गोठ्यासमोर पडली आणि पाहतापाहता संपूर्ण गावात कुतूहलाचा विषय बनला.मात्र ही चर्चा पसरताच आकाश निरीक्षण मंडळाच्या विदर्भ अध्यक्ष पंकज वंजारे यांनी पाहणी केली असता त्यांनी गार आकाशातून कोसळली नसल्याचं सांगितलं आहे.

संध्याकाळच्या सुमारास अचानक आभाळ दाटून आलं. काळेकुट्ट ढग, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाने गावकरी आधीच थोडे घाबरलेले. आणि त्याच दरम्यान आकाशातून प्रचंड मोठी गार जमिनीवर पडली. ही गार सर्वात आधी वासनिक यांची मुलगी मनीषा हिने पहिली. त्यानंतर गावकऱ्यांनी वासनिक यांच्या घरी गार पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. जरी एकच गार पडली असली तरी तिच्या वजनामुळे आणि एवढी मोठी गार कशी काय पडली याबाबत सध्या हमदापुर गावात चर्चा सुरू आहे.

या प्रकरणी आकाश निरीक्षण मंडळाचे विदर्भ अध्यक्ष म्हणाले, " हमदापूर येथे पडलेला दोन किलोचा बर्फाचा गोळा आकाशातून पडल्याचा जो समज पसरला होता तो चुकीचा असल्याचे आमच्या प्राथमिक पाहणीत स्पष्ट झाले आहे. घटनास्थळाची सखोल पाहणी केली असता ज्या ठिकाणी गार पडली असे सांगितले जाते तेथे केवळ एक सेंटीमीटर इतकाच खड्डा आहे. वास्तविक पाहता सहा फुटावरून दोन किलोचा दगड जमिनीवर टाकला तरी किमान दोन सेंटीमीटर खड्डा पडतो. " असे ते म्हणाले.

Wardha : वर्ध्यात ३ ते ४ किलोची भलीमोठी गार पडली; तज्ज्ञांच्या तपासणीत धक्कादायक निष्कर्ष
Vardha : वीजबिल वसुलीवरून वाद, कर्ज मिळत नाही म्हणून वसुली भाग;पाहा व्हिडीओ

पुढे ते म्हणाले," आकाशातून इतका मोठा बर्फाचा गोळा पडला असता तर त्या ठिकाणी मोठा खड्डा पडला असता तसेच बर्फाचे तुकडे झाले असते, पण तसे काहीही आढळलेले नाही. त्यामुळे हा बर्फाचा गोळा आकाशातून पडलाच नाही, तसेच त्या भागात भौगोलीक परिस्थिती सुद्धा तशी नव्हती हा निष्कर्ष आमच्या तपासणीत पुढे आला आहे." आकाश निरीक्षण मंडळाचे अध्यक्ष पंकज वंजारे यांनी सांगितले. मात्र ती गार नसून नेमका काय प्रकार आहे हे मात्र अद्याप अनुत्तरित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com