Online Fraud : 900 रुपयांचा ड्रेस 1 लाखाला पडला; वर्ध्यातील महिलेसोबत नेमकं काय घडलं?

wardha : तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर सावधान...कारण वर्धामध्ये ऑनलाइन शॉपिंग करणे महिलेला महागात पडलंय. 900 रुपयांचा ड्रेस खरेदी करताना महिलेला तब्बल एक लाखांचा फटका बसलाय. पाहूया नेमकं काय घ़डलंय.
Online Fraud
Online FraudSaam tv
Published On

नवी दिल्ली : सायबर गुन्ह्यांची संख्या मोठी वाढली आहे. 2024 वर्षात सायबर फसवणुकीचे सर्वाधिक गुन्हे नोंदवले गेले आहेत. केवळ मुंबईत 11 महिन्यात 55 हजार तक्रारी दाखल आहेत. ऑनलाईन शॉपिंग साईटची संख्या वाढली आहे. तुम्ही पण डिस्काऊंटला भुलून ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर सावधान....आम्ही असं का म्हणतोय....त्यासाठी वर्ध्यातील ही घटना पाहा...म्हसाळा येथे राहणाऱ्या राखी विठ्ठल रघाटाटे यांनी एका ऑनलाईन साइटवरून 997 रुपयांचा ड्रेस खरेदी केला होता. मात्र, तो ड्रेस त्यांना आवडला नसल्याने त्यांनी परत केला. याचा रिफंड त्यांना आला नाही. त्यासाठी त्यांनी कस्टमर केअर क्रमांकावर कॉल केला. तेथूनच त्यांच्या फसवणुकीला सुरुवात झाली.

Online Fraud
आयुष्याचा जोडीदार निवडताना अडचणी येतात? 'Acharya Chanakya' यांच्या 5 गोष्टी लक्षात ठेवा, भेटेल जन्मभराची साथ

ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ऑनलाईन शॉपिंग करताना कोणती काळजी घ्यावी ते पाहूया..

ऑनलाईन शॉपिंग करताना सावधान !

सुरक्षित वेबसाईटवरून खरेदी करा

वेबसाईटवर कधीही तुमचे पेमेंट डिटेल्स सेव करून ठेऊ नका

वस्तूवरील गॅरेंटी आणि वॉरंटी नक्की पाहा

वस्तू रिफंडचे नियम तपासुन घ्या

कंपनीच्या कस्टमर केअरला कॉल करताना सतर्क राहा

कस्टमर केअरचा अधिकृत नंबर असल्याची खात्री करा

बँकेचे डिटेल्स, ओटीपी, पीन, पासवर्ड शेअर करु नका

Online Fraud
Ladki Bahin Yojana: डिसेंबर की जानेवारी? लाडक्या बहिणींना पुढचा हफ्ता कधी मिळणार, समोर आली नवी तारीख

वर्षभर कोणत्या तरी निमित्ताने शॉपिंग साईटवर आकर्षक योजना असतात. ब्रॅण्डेड वस्तू कमी दरात मिळत असल्यामुळे ग्राहकांना भूरळ पडते. मात्र हा मोह तुम्हालाही महागात पडू शकतो. त्यामुळे सगळी काळजी घेऊनच ऑनलाईन खरेदी करा किंवा थेट दुकानात जाऊन निर्धास्तपणे खरेदीचा आनंद लुटा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com