विदर्भातील पहिली मोफत पीठ गिरणी; विरुळ ग्रामपंचायतीचा अनोखे उपक्रम 

विदर्भातील पहिली मोफत पीठ गिरणी आर्वी तालुक्यात येणाऱ्या विरुळ ग्रामपंचायतीने टॅक्स वसूल करण्यासाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यास सुरवात केली
Wardha Gram Panchayat
Wardha Gram PanchayatSaam Tv
Published On

सुरेन्द्र रामटेके

वर्धा: विदर्भातील पहिली मोफत पीठ गिरणी आर्वी तालुक्यात येणाऱ्या विरुळ ग्रामपंचायतीने टॅक्स वसूल करण्यासाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यास सुरवात केली आहे. ५ हजार लोकसंख्या असलेल्या विरुळ (Virul) येथील कुटुंबांना मोफत दळण देण्याचा ग्रामपंचायतीचा (Gram Panchayat) अभिनव उपक्रम सुरू केला आहे. वर्धा (Wardha) जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात येणाऱ्या विरुळ आकाजी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांसाठी विदर्भामधील पहिली "मोफत पीठगिरणी" कार्यान्वित करण्यात आली आहे. सरपंच आणि ग्रामपंचायत कमिटीमार्फत हा नाविण्यपूर्ण उपक्रम आणण्यात आला आहे.

हे देखील पहा-

या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून अनेक ग्रामस्थांच्या (villagers) कुटुंबाचा दळणखर्च वाचणार आहे. या अभिनवपूर्ण उपक्रमाला समजून घेण्यासाठी जिल्ह्याबाहेरील अनेक नागरिक विरूळ या ठिकाणी येऊन ग्रामपंचायतींना भेट देत आहेत. ५ हजार लोकसंख्या असलेल्या विरुळ येथील कुटुंबांना मोफत दळण दळून घेता येईल, या अनुषंगाने १० हॉर्स पॉवरची मशीन चक्कीवर बसविण्यात आली आहे. चक्कीला मोफत विद्युत पुरवठा व्हावा यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाच्या छतावर १० किलो वॅटचे सोलार पॅनल बसविण्यात आले आहे.

या सोलार पॅनलद्वारे प्रति महिन्याला १५०० युनिटची विद्युत निर्मिती स्वतः ग्रामपंचायत करत आहे. निर्मित केलेली वीज विरुळ येथील विद्युत पुरवठा जोडणी ग्रामपंचायत कार्यालय आणि विद्युत वितरण स्टेशन यांच्यामध्ये करण्यात आली आहे. त्या अनुशंगाने विद्युत स्टेशन कडून त्यांची विद्युत ग्रामपंचायत अंतर्गत चालत असलेल्या मोफत पीठ गिरणीला निरंतर पुरवठा करत आहे. यामुळे ग्रामपंचायतीला कुठल्याही प्रकारची वीजबिल आकारणी होत नाही.

Wardha Gram Panchayat
उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळणार; दिल्लीत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

तसेच, ग्रामस्थांनासुद्धा मोफत दळून घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. विरुळ ग्रामपंचायत आवारातच पीठ गिरणी उभारण्यात आलेली असून, नियमित ग्रामपंचायत चे कर देणाऱ्या कुटुंबाना मोफत दळण दिले जाते तर कर थकबाकीदारांना वाजवी दरात दळण दळून दिले जात आहे. तसेच, सार्वजनिक उत्सवाच्या कार्यक्रमासाठी वाजवी दरात दळण दळून दिले जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com