उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळणार; दिल्लीत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

ढगाळ आणि गडगडाटासह हलका पाऊस (rain) होण्याची शक्यता आहे.
Delhi Weather
Delhi WeatherSaam Tv
Published On

वृत्तसंस्था: राष्ट्रीय राजधानीत बुधवारी सकाळी उष्ण होते आणि किमान तापमान २५.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा ४ अंशांनी जास्त आहे. भारतीय (Meteorological Department) हवामान विभागाने (IMD) सांगितले आहे की, सकाळी ८:३० वाजता सापेक्ष आर्द्रता 39 टक्के नोंदवली गेली आणि कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

हे देखील पहा-

हलक्या पावसाचा अंदाज

हवामान विभाग (IMD अंदाज) दिलेल्या माहितीनुसार की वेगवेगळ्या ठिकाणी अंशतः ढगाळ आणि गडगडाटासह हलका पाऊस (rain) होण्याची शक्यता आहे. तसेच वाऱ्याचा वेग ३०-४० किमी प्रतितास होण्याची शक्यता आहे. IMD अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, दिल्लीमध्ये (Delhi) या हंगामात आतापर्यंत ७ दिवसांची नोंद झाली आहे. जेव्हा उष्णतेच्या लाटेमुळे लोकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे. दिल्लीतील लोकांना उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. कारण हवामान विभागानी १९ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्यान राष्ट्रीय राजधानीत धुळीचे वादळ आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

Delhi Weather
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी पुन्हा खुशखबर.. ‘हा’ मोठा बदल आजपासून ग्राहकांसाठी लागू

धुळीच्या वादळासह सरी पडतील

स्कायमेटवेदरचे उपाध्यक्ष (हवामानशास्त्र) महेश पलावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये २० आणि २१ एप्रिल रोजी धुळीचा पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com