Wardha To Kalamb Train: वर्धा ते कळंब रेल्वेगाडीचा झाला शुभारंभ, आजपासून नियमित सेवा होणार सुरू

Wardha News: दि. २९ फेब्रुवारीपासून वर्धा ते कळंब गाडी क्रमांक 51119 आणि कळंब ते वर्धा गाडी क्रमांक 511120 च्या नियमित सेवा सुरू होणार आहेत.
Wardha To Kalamb Train
Wardha To Kalamb TrainSaam tv
Published On

Wardha To Kalamb Train:

वर्धा – यवतमाळ – नांदेड या रेल्वे मार्गावरील वर्धा ते कळंब या रेल्वे गाडीचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. यावेळी वर्धा ते कळंब दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीला प्रधानमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवून ई-उद्घाटन केले. शुभारंभाप्रसंगी कळंब रेल्वे स्थानकावर खासदार रामदास तडस, रेल्वे अधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Wardha To Kalamb Train
Lok Sabha Survey: भाजप 370 चा आकडा गाठणार? काँग्रेसला किती मिळू शकते जागा; नवीन सर्वेक्षणात समोर आली माहिती

वर्धा –यवतमाळ- नांदेड असा नवीन रेल्वे मार्ग झाला असून आज दि. २८ फेब्रुवारी रोजी या मार्गावरील वर्धा ते कळंब या टप्प्याचे लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाले. लोकार्पणाप्रसंगीच वर्धा ते कळंब रेल्वेगाडी देखील सुरु करण्यात आली. (Latest Marathi News)

शुभारंभानंतर दि. २९ फेब्रुवारीपासून वर्धा ते कळंब गाडी क्रमांक 51119 आणि कळंब ते वर्धा गाडी क्रमांक 511120 च्या नियमित सेवा सुरू होणार आहेत. या गाड्या रविवार आणि बुधवार वगळता आठवड्यातून पाच दिवस चालतील, याशिवाय या गाड्यांना देवळी आणि भिडी स्थानकावर नियोजित थांबे असतील आणि मार्गावरील प्रवाशांच्या गरजा पूर्ण करतील.

Wardha To Kalamb Train
Sushma andhare: जरांगे यांच्यावर गुन्हे दाखल करायचे तर, नितेश राणेंच्या भाषणावर गुन्हा दाखल का नाही झाला? अंधारेंचा सवाल

या रेल्वे सेवांचा परिचय प्रदेशातील पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. याचा लाभ प्रवासी, व्यवसाय आणि स्थानिक समुदायांना होईल, सुरळीत कनेक्टिव्हिटी सुलभ होईल आणि कळंब आणि वर्धा दरम्यान अखंड प्रवास शक्य होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com