Wardha News : गावगुंडाचं काही खरं नाही, पोलीस अधिक्षकाने ड्युटीवर रुजू होताच दाखवल्या पोलीसी खाक्या

वर्धा जिल्ह्यात नव्याने रुजू झालेल्या पोलीस अधीक्षकांनी सगळीकडे कारवाईचा धडाका लावला आहे.
wardha news
wardha news saam tv
Published On

चेतन व्यास

Wardha News : वर्धा जिल्ह्यात नव्याने रुजू झालेल्या पोलीस अधीक्षकांनी सगळीकडे कारवाईचा धडाका लावला आहे. पोलीस अधीक्षकांच्या कठोर निर्णयामुळे आता गुन्हेगारांसह अवैध व्यवसायिकांना धडकी भरली आहे.नव्याने रुजू होताच पोलीस अधीक्षकांनी झिरो टॉलरन्स हा उद्देश समोर ठेवून कामाला सुरुवात केली आहे. पोलीस अधीक्षक नूरूल हसन यांनी आज सर्वच पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारांना यापुढे कायद्यात रहा असा दमच आपल्या अधिकाऱ्यांमार्फत दिला आहे.

wardha news
Andheri By-election: अंधेरी पूर्व मतदारसंघात 'या' तारखेपासून जाहीर प्रचारावर निर्बंध लागणार

पोलीस अधीक्षक यांनी वर्धा शहरासह जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसाय बंद करण्याचे आदेश देताच पोलीस अधिकारी कामाला लागले आहे. वर्धा (Wardha) शहरातील चारही पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना हद्दीतील सर्व सराईत गुन्हेगारांना पोलीस (Police) अधीक्षक कार्यालयात हजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

त्यापार्श्वभूमीवर शनिवारी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या समक्ष सराईत गुन्हेगारांनी हजेरी लावली.

पोलीस अधीक्षक हसन यांच्या मार्गदर्शनात गुन्हेगारांना पुन्हा असे गुन्हे कराल तर याद राखा, कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, कायद्यात राहाल तर फायद्यात राहालं, असा सज्जड दम देत पोलिसी खाक्या अधिकाऱ्यांनी दाखवत स्वतःच्या वागण्यात सुधारणा करण्याची तंबी दिली आहे. सोबतच हिंगणघाट, आर्वी आणि पुलगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनाही गुन्हेगारांना हजर करीत पेशी घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी दिले आहेत. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये धडकी भरली आहे.

wardha news
मंत्रालयात धक्कादायक प्रकार, अवर सचिवाने केला वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग, गोऱ्हेंची कारवाईची मागणी

पोलीस अधीक्षक हसन रुजू होताच त्यांनी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना शहरात एकही अवैध व्यवसाय सुरु राहणार नाही, याबाबत निर्देशीत केले आहे. पोलीस अधिक्षकांचे आदेश येताच अधिकाऱ्यांनी कारवाईचे सत्रच सुरु केले आहे. दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात हॉटेल आणि ढाब्यावर जर दारुविक्री किंवा पिताना कोणीही आढळल्यास आता थेट हॉटेल मालकावर कारवाई करत परवाना रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com