Andheri By-election: अंधेरी पूर्व मतदारसंघात 'या' तारखेपासून जाहीर प्रचारावर निर्बंध लागणार

अंधेरी पोटनिवडणुकीत मंगळवार दि. १ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून जाहीर प्रचारावर निर्बंध लागू होणार आहे.
Andheri By-Election
Andheri By-Electionsaam tv
Published On

रुपाली बडवे

Andheri By-Election : मुंबईतील आगामी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी दि. ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ७ वाजेपासून ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान होणार आहे. त्यामुळे मंगळवार दि. १ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून जाहीर प्रचारावर निर्बंध लागू होणार आहे. तसेच विविध स्तरीय निर्बंध देखील लागू होतील. या अनुषंगाने देण्यात येणाऱ्या सूचनांचे सर्व संबंधितांनी काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश अंधेरी पूर्व मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिले.

Andheri By-Election
मंत्रालयात धक्कादायक प्रकार, अवर सचिवाने केला वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग, गोऱ्हेंची कारवाईची मागणी

येत्या ३ नोव्हेंबर रोजी मुंबई (Mumbai) उपनगर जिल्ह्यातील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी मतदान होणार असून निवडणुकीसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार व आदर्श आचारसंहितेचा भाग म्हणून मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी ४८ तास आधीपासून जाहीर प्रचारावर निर्बंध लागू होण्यासह विविध स्तरीय निर्बंध लागू करण्यात येत आहेत.

Andheri By-Election
Eknath Shinde : महाराष्ट्रातील आदिवासी समाज प्रकाशझोतात येणार, तब्बल 11 हजार 199 कोटींचा निधी मिळणार

भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मतदान संपण्याच्या ४८ तास अगोदर पासून प्रचार, प्रसार व जाहिरात याबाबत असणारे निर्बंध आणि घ्यावयाची दक्षता याबाबत सर्व उमेदवारांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना प्रशिक्षणादरम्यान माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार सर्व संबंधितांनी काटेकोरपणे काळजी घेणे नियमानुसार बंधनकारक आहे. तसेच या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधितांविरोधात संबंधित कायदा (Law) व नियमांन्वये कठोर कारवाई करण्यात येईल, असेही निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी कळविले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com