Wardha : ठेवी परत द्या! वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विराेधात पंतसंस्था संघाची 'गांधीगिरी', सहकार दिंडीतून उठविला आवाज

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेपासून निघालेल्या दिंडीचा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ समारोप झाला.
wardha sahakar dindi andolan of sahakari patsanstha karmchari
wardha sahakar dindi andolan of sahakari patsanstha karmchariSaam Tv
Published On

- चेतन व्यास

Wardha News :

वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (wardha dcc bank) पतसंस्थांच्या ठेवी आहेत. परंतु मागील काही वर्षांपासून ठेवींची रक्कम न मिळाल्याने ठेवी असलेल्या पतसंस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पतसंस्थांना ठेवी परत देण्याच्या मागणीसाठी जिल्हा नागरी व ग्रामीण तथा कर्मचारी सहकारी पतसंस्थांच्या संघाच्या वतीने सहकार दिंडी काढण्यात आली. (Maharashtra News)

वर्धा जिल्ह्यातील सर्व पतसंस्थाच्या ठेवी शासनाचे सहकारी संस्था अधिनियम कलम ७०, कलम १४४- १० अ तसेच शासनाचे आदेशान्वये वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथील जिल्ह्यातील ठिकठिकाणी असलेल्या शाखेमध्ये अंदाजे ६० ते ६५ कोटी रूपयाच्या ठेवी जमा आहेत.

wardha sahakar dindi andolan of sahakari patsanstha karmchari
Balasaheb Thackeray Jayanti 2024 : वाशिममध्ये 'हिंदूत्व’ मोटरसायकल रॅली, कल्याणच्या भगवा तलाव परिसरात शिवसैनिकांकडून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन

सन २०१२ पासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक डबघाईस आल्यामुळे सर्व पतसंस्थाच्या ठेवी अडकुन पडल्या आहेत. ठेवी परत मिळत नसल्यामुळे जिल्हयातील सर्व पतसंस्थेच्या सभासदासोबत आर्थिक व्यवहार करण्यास अडचण निर्माण होत आहे. परिणामी बऱ्याच पतसंस्था जिल्हा बँकेप्रमाणेच डबघाईस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यामुळे पतसंस्थांना ठेवी परत देण्याच्या मागणीसाठी जिल्हा नागरी व ग्रामीण तथा कर्मचारी सहकारी पतसंस्थांच्या संघाच्या वतीने सहकार दिंडी काढण्यात आली. टाळांचा गजर करत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेपासून निघालेली दिंडीचा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ समारोप करण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar

wardha sahakar dindi andolan of sahakari patsanstha karmchari
Maratha Survey In Patan : पाटण तालुक्यात 38 हजार 736 कुणबी नोंदी आढळल्या, मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी आजपासून कार्यवाही

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com