Drone Camera : पोलिसांनी लढवली शक्कल; ड्रोनने शाेधले दारुचे अड्डे, अडीच लाखांचे साहित्य जप्त

महाराष्ट्रातील हा पहिला प्रयाेग असल्याचे मानले जात आहे.
wardha, drone, liquor
wardha, drone, liquorsaam tv

- चेतन व्यास

Wardha News : वर्धा जिल्ह्यात दारुबंदी असली तरीही बेकायदेशिररित्या दारू विक्री होत असल्याचं सर्वश्रुत होतं. परंतु पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी जिल्ह्यात रुजू होताच गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासह दारूबंदीवर प्रभावी अंमबजावणी करण्यावर भर दिला आहे. जिल्ह्याच्या अनेक जंगल परिसरात अतिशय दुर्गम भागात अवैधरित्या दारूभट्टी लावून दारू विक्री होत होती. यातील बहुतांश दारु तयार करणारे अड्डे पोलिसांनी उद्धवस्त केले. (wardha latest marathi news)

ज्या भागात पोलीस पोहोचणे अशक्य होते अशा दुर्गम भागात ड्रोनच्या साह्याने भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेऊन सायबर मधील कर्मचाऱ्यांनी अवैध गावठी दारू अड्डेचे लोकेशन निश्चित केले. त्यानंतर सेलू पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेने चार ठिकाणी यशस्वी कारवाया केल्या. (Maharashtra News)

wardha, drone, liquor
Maharashtra News : पाेलिसांची धडाकेबाज कारवाई; विदेशी, देशी रायफलींसह सहा अटकेत

सेलू पोलीस स्टेशनं अंतर्गत येणाऱ्या हिंगणी, धामणगाव, गोहदा, बोरी (कोकाटे) या परिसरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी दोन लाख साठ हजार तीनशे रुपयाचा मोहा रसायन आणी साहित्य नष्ट केला आहे. या कारवाईने अवैध दारू (liquor) व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

wardha, drone, liquor
Satara News : 'मुख्यमंत्रीही एकेकाळी रिक्षा चालवत हाेते'; शिवेंद्रराजेंनी गाठलं आरटीओ कार्यालय

पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या संकल्पनेनुसार वर्धा (wardha) जिल्ह्यातील इतरही पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या जंगल परिसरात ड्रोनच्या मदतीने जंगल परिसरात असलेल्या दारू भट्ट्या उध्वस्त करण्यात येणार आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच दारूबंदीच्या कार्यक्रमात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. जिल्ह्यात आधुनिक पद्धतीचा अवलंब करुन दारू अड्ड्यांचा शोध घेतला जात असून या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

wardha, drone, liquor
Maratha Kranti Morcha : ऐतिहासिक चित्रपट याेग्यच असावा, अन्यथा गाठ आमच्याशी : मराठा क्रांती माेर्चा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com