Wardha: पुराच्या पाण्यात मनोरुग्ण व्यक्तीने घेतली उडी, ६ तास उलटलूनही अद्याप थांगपत्ता नाही

सहा तासांच्या शोध मोहिमेनंतरही व्यक्ती मिळाली नसल्याची माहिती खरांगणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांनी दिली.
Wardha News
Wardha Newsचेतन व्यास

चेतन व्यास -

वर्धा: वर्धा जिल्ह्यात (Wardha District) सगळीकडे मुसळधार पावसाने चांगलेच थैमान घातलं आहे. सततच्या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात एका मनोरुग्ण व्यक्तीने उडी मारल्याने तो पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्देवी घटना आर्वी तालुक्याच्या कासारखेडा येथे घडली.

सहा तासांच्या शोध मोहिमेनंतरही व्यक्ती मिळून आला नसल्याची माहिती खरांगणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांनी दिली. कृष्णा नान्हे (४८) राहणार सावध असे पुराच्या पाण्यात उडी घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पाहा व्हिडीओ -

कृष्णा नान्हे यांनी आज पहाटे ६ वाजताच्या सुमारास कासरखेडा गावातील पुलावरुन पुराच्या पाण्यात उडी घेतली. या घटनेची माहिती मिळताच खरांगणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर हे त्यांच्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले. कृष्णा नान्हे यांचा शोध घेणे सुरु केले.

सावध गावात वर्धा मुख्यालयातील रेस्क्यू पथक बोलाविण्यात आले असून डिझेल बोटीच्या सहाय्याने संपूर्ण पुराच्या पाण्यात पथकातील कर्मचाऱ्यांनी कृष्णाचा शोध घेतला. शोध पथकाने पवनार येथील धामनदीपात्रापर्यंत कृष्णाचा शोध घेतला. मात्र, सहा तासांचा कालावधी उलटूनही कृष्णा याचा अद्याप थांगपत्ता लागला नसून अजूनही शोध मोहिम सुरुच ठेवण्यात आली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com