Wardha Traffic Police : मॉडीफाय सायलेन्सरवर चालविला बुलडोझर; वर्धा वाहतूक पोलिसांची कारवाई

Wardha News : वर्धा शहरात मॉडीफाय सायलेन्‍सरविरोधात कारवाई मागील काही काळापासून सुरु आहे. कारवाई अंतर्गत शहरातील दुचाकीस्‍वारांना दंड करण्‍यात आले. तसेच मॉडीफाय सारलेन्‍सरही जप्‍त करण्‍यात आले होते
Wardha Traffic Police
Wardha Traffic PoliceSaam tv
Published On

चेतन व्यास 
वर्धा
: बुलेट किंवा दुचाकीला मॉडिफाय करत कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर जोडले जाते. अशा सायलेन्सरचा जोरदार आवाज करत दुचाकी पळवणारे बहुतांश शहरांमध्‍ये दिसतात. काही दुचाकीस्‍वारांनी दुचाकीच्या सायलेन्सरमधून फटाक्यांसारखा आवाज काढत उच्छाद मांडलेला दिसतो. अशा हुल्‍लडबाज दुचाकीस्वारांवर धडक कारवाई वर्धेच्या वाहतूक शाखेने केली आहे. असे सायलेन्सर जप्त करत तब्‍बल पन्नासहून अधिक सायलेन्सर बुलडोझरखाली दाबून नष्‍ट करण्‍यात आले आहे.

कॉलेजकुमार आणि टवाळखोर मुले सायलेन्सरमध्ये मॉडीफाय करून कर्णकर्कश्य आवाज करत फिरत असतात. अश्यांवर आता पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. वर्धा शहरात मॉडीफाय सायलेन्‍सरविरोधात कारवाई मागील काही काळापासून सुरु आहे. या कारवाई अंतर्गत शहरातील दुचाकीस्‍वारांना दंड करण्‍यात आले आहे. तसेच मॉडीफाय सारलेन्‍सरही जप्‍त करण्‍यात आले होते. वाहतूक शाखेने जप्‍त केलेले मॉफीडाय सायलेन्सर नष्‍ट करण्‍यासाठी त्‍यावर बुलडोझर चालविण्यात आला. 

Wardha Traffic Police
Nandurbar Politics : हिना गावित मुख्यमंत्र्यांची बदनामी करताय; आमदार आमश्या पाडवी यांचा आरोप

५० सायलेन्सर केले नष्ट 

वाहतूक पोलिस निरीक्षक सतीश डेहनकर यांनी सांगितले की दुचाकी सायलेंसर फटाक्यासारखा आवाज सोडतात. ज्यामुळे सुरक्षिततेला धोका निर्माण होतो आणि अपघाताची शक्यता वाढते. याविरोधात मोहीम राबवत आहोत. आतापर्यंत अनेक दुचाकीस्वारांना दंड ठोठावला आहे. शिवाय, बदल केलेले सायलेन्सर जप्त केले आहेत आणि आज पन्नासहून अधिक आज नष्ट करण्यात आले.

Wardha Traffic Police
Nagpur Crime : दारू पिऊन वडिलांची आईला मारहाण; चिडलेल्या मुलाकडून भयानक कृत्य

आगामी काळातही कारवाई 

आगामी काळात देखील कारवाई सुरूच राहणार असून  कोणाला असे बुलेटस्वार किंवा इतर वाहन चालक दिसल्यास वर्धा वाहतूक पोलिसांना माहिती कळविण्याचे आवाहन वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकांनी केले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सतिश डेहनकर, चंदू खोंडे, रियाज खान, आरीफ खान, कय्युम शेख , दिलीप कामठी, गिरीश वाटखेडे, शिल्पा पिस्सुडे, जोशना मेश्राम या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com