चेतन व्यास
वर्धा : वर्धेच्या रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर चार्जिंगवर असलेला प्रवाश्याचा मोबाइल चोरट्याने चोरून नेला. ही घटना रेल्वे स्थानकाच्या (CCTV) सीसीटीव्हीत कैद झाली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी (Railway Police) सिसिटीव्ही तपासात आरोपीला अटक केली. आरोपीजवळून चोरी केलेला मोबाईलही हस्तगत करण्यात आला. (Wardha News Mobile Theft)
सदर मोबाईल चोरीची (Theft) घटना प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील नवीन पुलाजवळ घडली. रवींद्र दिलीप कन्नाके (रा. आदिवासी कॉलनी आर्वी नाका, वर्धा) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान डॉ. राजेश विक्रम वासनिक हे ट्रेन (क्र. ०११४) एक्स्प्रेसमधून प्रवास करण्यासाठी (Wardha) वर्धेच्या रेल्वेस्थानकवरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर रेल्वेची (Railway) वाट पाहत बसले होते. त्यांनी जवळील ११ हजार ९९० रुपयांचा मोबाइल चार्जिंगवर लावून स्टॉलवर साहित्य खरेदी करण्यासाठी गेले होते. याचा फायदा घेत चोरट्याने मोबाइल चोरून घेऊन पळ काढला. डॉ. राजेश यांनी याची माहिती आरपीएफ ठाण्यात देत तक्रार नोंदविली.
पोलिसांनी लागलीच तपासले सीसीटीव्ही
रेल्वे पोलिसांनी फलाटावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने शोध घेतला असता एक व्यक्ती संशयास्पद दिसून आला. रेल्वे पोलिसांच्या टिमने जुन्या पुलाजवळ बसलेल्या व्यक्तीची विचारपूस केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. आरपीएफ जवानांनी आरोपी रवींद्र दिलीप कन्नाके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन चोरीतील मोबाइल जप्त केला. निरीक्षक रामसिंग मीना यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली असून निर्देशानुसार आरोपी चोरट्यास लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.