Wardha GBS Case : वर्धा जिल्ह्यात जीबीएसचा शिरकाव; आष्टी तालुक्यात वृद्धाला बाधा

wardha News : यवतमाळ येथील रहिवासी ३५ वर्षीय व्यक्तीला जीबीएस आजार आढळून आला. त्याच्यावर वर्धेच्या सावंगी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे
Wardha GBS Case
Wardha GBS CaseSaam tv
Published On

चेतन व्यास 
वर्धा
: गुइलेन- बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचा शिरकाव वर्धा जिल्ह्यात झाला आहे. आष्टी तालुक्यातील ८५ वर्षीय वयोवृद्ध रुग्ण आढळून आला असून रुग्णावर नागपुरातील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. वर्धा जिल्ह्यात पहिला रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.  

‘जीबीएस’ हा आजार दुर्मीळ असून त्याचे नेमके कारण अद्यापही अस्पष्ट आहे. कोरोना पाठोपाठ आता गुइलेन बॅरे सिंड्राेम या दुर्मीळ आजाराचा वर्धा जिल्ह्यात शिरकाव झाला आहे. जीबीएस बाबत खबरदारीच्या उपाययोजना संदर्भात जिल्हा परिषदेच्या सिंधूताई सपकाळ सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील १२३ सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांचे शिबिर घेतले. शिबिरात आवश्यक त्या सूचना देखील आरोग्य विभागाकडून करण्यात आल्या. 

Wardha GBS Case
Shirpur Accident : मामाला भेटायला जाताना काळाचा घाला; ट्रकची दुचाकीला धडक, तरुणाचा मृत्यू

वर्ध्यात एकावर उपचार 

दरम्यान वर्धा जिल्ह्यात जीबीएसचा रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णावर नागपूर येथे उपचार सुरु आहेत. दरम्यान यवतमाळ येथील रहिवासी ३५ वर्षीय व्यक्तीला जीबीएस आजार आढळून आला. त्याच्यावर वर्धेच्या सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. मात्र वर्ध्याच्या आष्टी तालुक्यात रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. 

Wardha GBS Case
Raju Patil News : गंगेतील डुबकीपेक्षा त्या इमारतीतील रहिवाशांना भेटा जास्त पुण्य मिळेल; मनसे नेते राजू पाटील यांचा एकनाथ शिंदेंना टोला

आरोग्य विभागाचे आवाहन 
जीबीएस हा ‘न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर’ असलेला आजार सामान्यत: न शिजवलेल्या अन्नामध्ये आढळणाऱ्या कॅम्पिलोबॅक्टर या जीवाणूमुळे होणाऱ्या संक्रमणामुळे होतो. मात्र हे एक कारण आहे. त्यामुळे न शिजवलेले अन्न खाऊ नये. काही खाण्यापूर्वी हात चांगले धुतल्यास आजार टाळण्यास मदत होऊ शकते. पाणी उकळून थंड करून प्यावे. इन्फ्लुएंझा व्हायरससारखे इतर व्हायरस म्हणजे झिका व्हायरस, हिपॅटायटीस व्हायरस आणि एचआयव्हीमुळे असामान्य रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होऊ शकते. त्यामुळे हा आजार होऊ शकतो, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. आर. जे. पराडकर यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com