Pankaj Bhoyar : शेतकऱ्यांना आता मिळणार विना शुल्क पोलीस बंदोबस्त; पालकमंत्री पंकज भोयर यांची घोषणा

Wardha News : गृहराज्य मंत्री पंकज भोयर यांनी शेतकऱ्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून पोलीस बंदोबस्तासाठी लागणाऱ्या शुल्कातून शेतकऱ्यांची सुटका झाली. केवळ अर्ज दिल्यानंतर शेतकऱ्यांना बंदोबस्त मिळणार.
Pankaj Bhoyar
Pankaj BhoyarSaam tv
Published On

चेतन व्यास 
वर्धा
: शेतकऱ्यांची वहीवाट असलेले रस्ते, पांधन रस्ते मोकळे करतांना लागणाऱ्या पोलीस बंदोबस्त करिता शेतकऱ्यांना कोणताही शुल्क भरावे लागणार नसल्याची घोषणा गृहराजमंत्री पंकज भोयर यांनी केली. पूर्वी शेतकऱ्यांना बंदोबस्त करिता शुल्क भरावा लागला जात होता. यामुळे या घोषणेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे गृहराज्यमंत्री तथा वर्धेचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं.

राज्यात सरकार स्थापन होताच पाच वर्षात शेतकऱ्यांच्या शेताला जाणारे पांधन रस्ते शंभर टक्के तयार करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या दृष्टीने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. यात एक पाऊल पुढे टाकत गृहराज्य मंत्री भोयर यांनी सदरची घोषणा केली आहे. वर्धा येथील नियोजन भवनात महसूल सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रम नंतर पत्रकारांशी संवाद साधतं होते.

Pankaj Bhoyar
Shahada News : पाच महिन्यांपासून रेशन मिळेना; ग्रामस्थ आक्रमक, तहसील कार्यालयावर महिलांची धडक

अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या पांधन रस्त्याना अतिक्रमनाने विळखा घातला आहे. तर काही ठिकाणी दोन शेतकऱ्यांमध्ये असलेल्या वादातून रस्ता अडवीला जातो. यानंतर महसूल अधिकाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांचे रस्ते मोकळे केले जातं. मात्र यादरम्यान लागणार पोलीस बंदोबस्तसाठी शेतकऱ्यांना पैसे भरावे लागत होते. यामुळे रस्ते मोकळे करतांना विलंब देखील लागत होता. 

Pankaj Bhoyar
Sakoli Talav : वृद्ध दांपत्याच्या घरात पहाटे शिरलं पाणी; मुलांच्या सतर्कतेने वाचला जीव, कोंबड्यांसह साहित्य मात्र गेले वाहून

सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश 

राज्याचे मुख्यमंत्री आणी महसूलमंत्री यांच्या सदर बाब लक्षात आल्यावर त्यांनी शेतकऱ्यांना रस्ते मोकळे करतांना पोलीस संरक्षणावर आता कोणताही शुल्क लागणार नसल्याची घोषणा केली आहे. तसे आदेश सुद्धा सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. राज्यात आजपासुन महसूल सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या साप्ताहचे उदघाटन संपूर्ण राज्यात करण्यात आले असून साप्ताहच्या पहिल्या दिवशी सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या या निर्णयाच स्वागत केला जातं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com