Sakoli Talav : वृद्ध दांपत्याच्या घरात पहाटे शिरलं पाणी; मुलांच्या सतर्कतेने वाचला जीव, कोंबड्यांसह साहित्य मात्र गेले वाहून

Bhandara News : मुसळधार पावसामुळे तलाव तुडुंब भरला होता आणि तलाव फोडण्याची शक्यता साकोलीचे माजी नगरसेवक मनीष कापगते यांनी काही दिवसापूर्वीचं व्यक्त केली होती. मात्र, प्रशासनानं याकडं दुर्लक्ष केले
Bhandara News
Bhandara NewsSaam tv
Published On

शुभम देशमुख 
भंडारा
: भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने तलाव तुडुंब भरले आहेत. यातच साकोली तलाव तुडुंब भरल्याने तलावाचा बांध अचानक फुटल्याने आजूबाजूच्या शेतशिवारात पाणीच पाणी शिरले आहे. यातच शेतात असलेल्या घरात गाढ झोपेत असलेल्या वृद्ध दाम्पत्याच्या घरात देखील पाणी शिरले होते. सुदैवाने या वृद्ध दाम्पत्याचा जीव मुलांच्या सतर्कतेने वाचला आहे. मात्र घरातील साहित्य डोळ्यादेखत वाहून गेले आहे. 

भंडाऱ्याचा साकोली येथील जुना शहरात असलेला मुख्य तलाव पहाटे फुटला. मुसळधार पावसामुळे तलाव तुडुंब भरला होता. दरम्यान आज पहाटे या तलावाचा बांध फुटला आहे. यामुळे तलावाच्या आजूबाजूच्या शेतांमध्ये पाणी शिरले असून यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. साकोली ते लाखांदूर मार्गावरील शेतातील घरात राहणाऱ्या लांजेवार वृद्ध दांपत्यांच्या घरापर्यंत हा पाण्याचा लोंढा पोहचला होता.

Bhandara News
Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट निकालानंतर शहरात शांतता; पोलीसांकडून बंदोबस्त तैनात, दुकाने बंद

शेतात राहून कुक्कुट पालनाचा व्यवसाय आणि शेती सांभाळणारे लांजेवार वृद्ध दांपत्य शेतातील घरात पहाटेच्या सुमारास गाढ झोपेत होते. याचवेळी साकोली तलावाचा पाट फुटल्याने पाण्याचा लोंढा शेतशिवारात पोहचला. साकोली ते लाखांदूर मार्गावरील शेतातील घरात राहणाऱ्या लांजेवार वृद्ध दांपत्यांच्या घरापर्यंत हा पाण्याचा लोंढा पोहचला. मात्र, झोपेत असलेल्या या वृद्ध दांपत्याला याची कल्पना नव्हती.

मुलांनी घेतली धाव 

दरम्यान गावात राहणाऱ्या त्यांच्या मुलांना याची माहिती मिळतात त्यांनी वृद्ध आई- वडिलांचा जीव वाचवण्यासाठी थेट शेतात धाव घेतली. त्यांनी वृद्ध दाम्पत्यांना शेतातून बाहेर काढलं. यामुळे सुदैवाने या वृद्ध दाम्पत्याचा जीव वाचला आहे. अन्यथा पुराच्या पाण्यात त्यांचा जीव जाण्याची शक्यता होती. या सोबतच गोठ्यात बांधलेली त्यांची दुधाळ पाळीव जनावरही पाण्यातुन बाहेर काढल्याने ती बचावली आहेत. 

Bhandara News
Shahada News : पाच महिन्यांपासून रेशन मिळेना; ग्रामस्थ आक्रमक, तहसील कार्यालयावर महिलांची धडक

अन्नधान्यासह कोंबड्या गेल्या वाहून 

मात्र, घरात साठवून ठेवलेलं वर्षभराचं अन्नधान्य आणि जीवनोपयोगी साहित्यसह कुक्कुट पालनाच्या ५० पेक्षा अधिक कोंबड्यांना बाहेर काढू शकले नाहीत. तलाव फुटल्यानं पाण्याच्या लोंढ्याचे पाणी क्षणात घरात साचल्यानं आता घर हे पाण्याखाली आले आहे. यामुळे घरातील संपूर्ण साहित्य पाण्याखाली आले आहे. तर डोळ्यादेखत कोंबड्या वाहून गेल्याचे साकोलीच्या लांजेवार दांपत्यांनी अनुभवला. या वृद्ध दांपत्यांना लाखो रुपयांच्या नुकसानीचा फटका बसला असून सध्या ते त्यांच्या मुलांकडं साकोली येथे सुरक्षितस्थळी आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com