Devendra Fadnavis Eknath Shinde
Devendra Fadnavis Eknath ShindeSaam tv

Wardha News: CM शिंदेंच्या वाहनाचे स्टेअरिंग फडणवीसांच्या हाती; समृद्धी महामार्गाची केली पाहणी

मुख्‍यमंत्र्यांचे स्‍टेअरींग फडणवीसांच्‍या हाती
Published on

चेतन व्यास

वर्धा : नागपूर येथून समृद्धी महामार्गास प्रारंभ होत असून तेथून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी पाहणी दौरा सुरु केला. वर्धा (Wardha) जिल्ह्यात समृद्धीचा 55 किलोमीटरचा मार्ग असून या मार्गाची पाहणी करण्यात आली. यावेळी एकाच वाहनात मुख्यमंत्री आणी उपमुख्यमंत्री होते. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे स्वतः वाहन चालवित मुख्यमंत्री शिंदे यांचे सारथी बनले होते. (Breaking Marathi News)

Devendra Fadnavis Eknath Shinde
Accident News: बस– कारचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्‍यू, बसमधील तेरा प्रवासी गंभीर

येत्या काही दिवसात हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या (Nagpur) नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे लोकार्पण होत आहे. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाची पाहणी केली. वर्धा जिल्ह्यात महामार्गावर (Samrudhi Mahamarg) दोन टोल प्लाझा देण्यात आले आहे. यापैकी विरुळ येथे टोल प्लाझा व परिसराची त्यांनी पाहणी केली. येथे आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार तसेच समृद्धी महामार्गाचे अधिकारी उपस्थित होते.

वर्धा जिल्ह्यात सेलू, वर्धा व आर्वी या तालुक्यातून महामार्ग जात आहे. एकुण लांबी 55 किमी आहे. महामार्गाची रुंदी 120 मीटर असून सदर मार्ग 6 पदरी आहे. मार्गावर 5 मोठे व 27 लहान अशा 32 पुलांचा समावेश आहे. महामार्गावरील वाहतुक विना अडथळा होण्यासाठी 9 ठिकाणी उड्डान पूल उभारण्यात आले आहे. येळाकेळी व विरुळ येथे इंटरचेंजेस देण्यात आले आहे. वन्यप्राण्यांचा संचार असलेल्या भागात दोन ठिकाणी उन्नत मार्ग आहे. महामार्गासाठी 782 हेक्टर जमीनीचे अधिग्रहन करण्यात आले आहे तर 2 हजार 762 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com