Wardha News: सोयाबीन पिवळे पडत असल्याने नुकसान; बीआरएसची तहसीलवर धडक, ५० हजार रुपये हेक्टरीची मागणी

Wardha News: सोयाबीन पिवळे पडत असल्याने नुकसान; बीआरएसची तहसीलवर धडक, ५० हजार रुपये हेक्टरीची मागणी
BRS Wardha News
BRS Wardha NewsSaam tv
Published On

चेतन व्यास
वर्धा
: वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. परंतु सोयाबीन पीक पिवळे (Wardha) पडत असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना (Farmer) मदत मिळावी यासाठी बीआरएसची तहसील कार्यालयावर धडक देत मदतीची मागणी केली आहे. (Tajya Batmya)

BRS Wardha News
Sambhajinagar News: ...तर महिला सरपंचाचे पद जाऊ शकते; ग्रामपंचायतीतील सरपंचांच्या पतींची लूटबूड थांबणार

भारत राष्ट्र समितीचे उमेश वावरे यांच्या नेतृत्वात आज वर्धेच्या हिंगणघाट येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढत धडक देण्यात आली. वर्धा जिल्ह्यात सोयाबीनचे पीक (Soyabean Crop) मोठ्या प्रमाणात पिवळे पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे. शेतात केलेला खर्च निघणे देखील शक्य नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे..

BRS Wardha News
Green Fodder: पंढरपुरात हिरव्या चाऱ्याचे भाव भडकले; पाऊस नसल्याने चाऱ्याची टंचाई

दिला आंदोलनाचा इशारा 

सोयाबीन पिवळे पडत असल्याने तातडीने कृषी अधिकाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करत शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत करण्यात यावी. तसेच शेती पीकांवर आलेल्या संकटावर उपाययोजना करण्यात यावी. ही मागणी यावेळी करण्यात आलीय. मागणी मान्य न झाल्या मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com