Green Fodder: पंढरपुरात हिरव्या चाऱ्याचे भाव भडकले; पाऊस नसल्याने चाऱ्याची टंचाई

Pandharpur News : पंढरपुरात हिरव्या चाऱ्याचे भाव भडकले; पाऊस नसल्याने चाऱ्याची टंचाई
Green Fodder
Green FodderSaam tv
Published On

पंढरपूर : पावसाळा सुरु झाल्यानंतर साधारण २ महिन्यानंतर जनावरांसाठी हिरवा चार उपलब्ध होत असतो. मात्र ऑगस्ट महिना संपत आला; तरी अद्याप पंढरपूर (Pandharpur) परिसरात पाऊस (Rain) नसल्याने जनावरांच्या हिरव्या चार्याची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे हिरव्या चाऱ्याला मागणी वाढल्याने चाऱ्याचे भाव भडकले आहेत. (Live Marathi News)

Green Fodder
Dengue Viral : नागपुरात डेंग्यूचा प्रकोप; तिनशेवर रुग्ण, तीन हजारांवर संशयित

पावसाळा संपत आला तरी अद्याप पंढरपुरात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यातच भीमानदी आणि कालवे कोरडे पडले आहेत. त्यामुळे पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा या भागात शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यातच आता (Farmer) जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या ऊस आणि मक्याच्या हिरव्या चाऱ्याचा भाव प्रतिटन चार ते पाच हजार रुपयापर्यंत गेला आहे. चढ्या भावाने चारा खरेदी करणे परवडत नसल्याने पशु पालकांची आर्थिक कोंडी झाली आहे.

Green Fodder
Sanjay Raut In Khupte Tithe Gupte: ...तर नारायण राणेंची खासदारकी जाऊ शकते; संजय राऊतांचा मोठा दावा

हिरवा चारा ५ हजार टन 
पंढरपूरच्या बाजारात आज ५० टन हिरव्या चाऱ्याची आवक झाली होती. ऊसाला प्रति टन ३ हजार २०० तर मका, कडवळ या हिरव्या चाऱ्याचा प्रति टन पाच हजार रुपयांपर्यंत दर गेला आहे. चार्याची आवक कमी आणि मागणी जास्त वाढल्याने हिरव्या चाऱ्याचे दर वाढले आहेत. शासनाने चारा छावण्या सुरु कराव्यात अशी मागणी पशु पालक शेतकर्यांमधून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com