Dasara Melava: वर्धा जिल्ह्यातून शिंदे गटाच्या मेळाव्याकरिता 12 बस रवाना

वर्धा जिल्ह्यातून शिंदे गटाच्या मेळाव्याकरिता 12 बस रवाना
Wardha News Dasara Melava
Wardha News Dasara MelavaSaam tv

चेतन व्यास

वर्धा : मुंबईच्या बीकेसी मैदानावर बुधवारी शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याकरिता वर्धा (Wardha) जिल्ह्यातूनही बसने कार्यकर्ते रवाना झाले आहेत. जिल्ह्याच्या आठ तालुका मिळून एकूण 12 बस मुंबईला (Mumbai) रवाना करण्यात आल्या आहे. (Wardha News Dasara Melava)

Wardha News Dasara Melava
Accident News : उदगीर - लातूर बसचा भीषण अपघात; कार चक्काचूर, चार ठार, मदत कार्य सुरु

वर्धेच्या शिंदे गटाच्या कार्यालयासमोरून सकाळी बसला झेंडा दाखवून (Dasara Melava) रवाना करण्यात आले आहे. शिंदे गटाच्या कार्यालयासमोरून कार्यकर्त्यांनी भरलेली बस शिंदे गटाचे संपर्क प्रमुख राजेश सराफ यांनी झेंडा दाखवून रवाना केली. जिल्ह्यातून 12 बसने हे कार्यकर्ते रवाना करण्यात आले आहे. मेळाव्यावरून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पहावायास मिळत आहे.

ठाकरे गटाच्‍या हालचाली नाही

मुंबई येथे शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून मेळावे आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्याना दोन्ही गट आपले शक्ती प्रदर्शन करत आहे. शिंदे गटाकडून जिल्ह्यातून बसने कार्यकर्ते मुंबईला पाठविण्यात आले आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून जिल्ह्यात कोणत्याही हालचाली दिसत नाहीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com