चेतन व्यास
वर्धा : वर्ध्यातील सेवाग्राम येथे तयार केलेल्या गांधीजी (Mahatma Gandhi) आणि नेल्सन मंडेला यांच्या अर्धाकृती मूर्ती दक्षिण आफ्रिकेला (South Aftica) पाठवण्यात येणार आहेत. गांधीजींच्या विचारांचा प्रसार व्हावा, याकरिता जय जगत हा नारा घेउन कार्य करणारे जालंधरभाई या मूर्ती तयार करत आहेत. लवकरच १०० मूर्ती दक्षिण आफ्रिकेत नेण्यात येणार आहेत. फायबर मटेरियलपासून या मूर्ती तयार करण्यात येत आहेत. (Tajya Batmya)
जय जगत वर्ल्ड पीस ग्रुपचे सदस्य जगातील वेगवेगळ्या देशात भ्रमंती करतात. गांधींजीना मानणारी (Wardha News) मंडळी यातून गांधीजींच्या विचाराचा प्रचार, प्रसार करण्याचे काम करते. टॉलस्टॉय फार्ममध्ये रचनात्मक काम केली जाणार आहे. त्या निमित्ताने तेथील संचालकांनी महात्मा गांधींजी आणि नेल्सन मंडेला यांच्या मूर्ती मागविल्या आहेत.
तीन महिन्याचा कालावधी
सेवाग्राम आश्रममध्ये राहणारे जालंधर भाई सध्या या मूर्ती बनवण्यात व्यस्त आहेत. गांधीजींच्या ५० आणि मंडेला यांच्या ५० अशा १०० मूर्ती दक्षिण आफ्रिकेला पाठवण्यात येणार आहेत. जवळपास तीन महिन्याचा कालावधी मूर्ती बनवण्यास लागला आहे.
३० जानेवारीला मुर्ती वितरीत
गांधीजींच्या विचाराचा प्रचार प्रसार करताना २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेला गेले होते. दक्षिण आफ्रिकेत टालस्टाय फार्मची स्थापना गांधीजींनी १९१० मध्ये केली होती. ही जागा जोहानसबर्ग पासून २१ किलोमीटर दूर ११०० एकरमध्ये आहे. ही जागा हरमन कालेनबाख यांनी भेट दिली आहे. दक्षिण आफ्रिकेतील टालस्टाय फार्ममध्ये गांधीजींच्या मूर्ती ठेवल्या असता पर्यटकांत वाढ झाली. आता तेथे १०० मूर्ती नेण्यात येणार आहेत. ३० जानेवारीला आयोजित कार्यक्रमात या मूर्ती तेथे वितरीत करण्यात येणार असल्याचे जालंधर यांनी सांगितले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.