

चेतन व्यास, प्रतिनिधी...
Wardha Crime News: वर्धा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्धा शहरा लगत असलेल्या अज्ञात ह्यूंडाई कंपनीच्या शोरुममध्ये तीन लुटाऱ्यांनी प्रवेश करीत सुरक्षा रक्षकाच्या गळ्यावर चाकू लावून नवी कार चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. पण, कार सुरु न झाल्याने लुटाऱ्यांनी सेकंडहॅण्ड कार घेऊन पोबारा केला आहे.
ही थरारक घटना मध्यरात्री १.३० ते २ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)
याबाबत अधिक माहिती अशी की, वर्धा (Wardha) शहरालगतहून गेलेल्या दत्तपूर ते सावंगी वळण रस्त्यावर ह्यूंडाई कंपनीचे चारचाकी शोरुम आहे. मध्यरात्रीच्या सुमारास सुरक्षा रक्षक झोपून असताना तीन लुटारुंनी शोरुममागील सुरक्षा भिंत ओलांडून शोरुममध्ये प्रवेश केला. झोपेत असलेल्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करीत त्याला चाकूचा धाक दाखवून कारच्या चाव्या मागितल्या.
शोरुमचे शेटर उघडायला लावत ड्राव्हरमधील रोख रक्कम हिसकावून घेत कारच्या चाव्यांचा गुच्छा घेऊन कार उघडू लागले. अखेर एक सेकंडहॅण्ड कार सुरु झाली असता लुटारुंनी तीच कार आणि रोख रक्कम घेऊन तेथून पळ काढला. याबाबतची माहिती सुरक्षा रक्षकाने सेवाग्राम पोलिसांना दिली. (Crime News)
घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तत्काळ शोरुम गाठून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि सेवाग्राम पोलिसांकडून सुरु आहे. दरम्यान, शोरुम शेजारी असलेल्या चार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये लुटारु कैद झाले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्हीचे डिव्हीआर जप्त केले असून त्यानुसार तपास सुरु आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.