Crime News : तू माझी झाली नाहीस तर कुणाचीच होऊ देणार नाही; एकतर्फी प्रेमातून तरुणाचा गोंधळ

एकतर्फी प्रेमातून तरुणाचं टोकाचं पाऊल
Wardha Crime News
Wardha Crime NewsSaam Tv
Published On

चेतन व्यास, वर्धा

Wardha News - वर्ध्यातून (Wardha) एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीच्या घरी जाऊन तिला मी तुझ्यावर प्रेम करतो, माझ्याशी लग्न कर, असे म्हटले. तरुणीने नकार दिला असता तुला व तुझ्या घरच्यांना जिवे मारून मी स्वत:च्या जिवाचे कमी-जास्त करून तुम्हाला फसविल, तू माझी नाही तर कुणीच नाही, असे म्हणत एकतर्फी प्रेमातून तरुणाने गोंधळ घालून तरुणीला मारहाण करून विनयभंग केला. ही घटना तळेगाव पोलीस (Police) स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पार्डी गावात घडली. याप्रकरणी तळेगाव (श्या. पंत) पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

Wardha Crime News
Maharashtra Politics : ‘अरे’ ला ‘कारे’ करण्याची हिंमत असती तर.., सामनातून CM शिंदेंसह भाजपवर टीका

तरुणी महाविद्यालयात असताना तिची ओळख तुषार नामक तरुणाशी झाली. दोघांत मैत्री झाली. मात्र, तुषारने एकतर्फी प्रेमातून तरुणीला ‘प्रपोज’ केला. मात्र, तरुणीने त्याला आपण फक्त मित्र राहू, असे म्हणत त्याचे ‘प्रपोजल’ नाकारलं. सुमारास तरुणी तिच्या भावासोबत घरी असताना तुषार हा घरी आला आणि माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, तू हो म्हण, असे म्हटले असता तरुणीने नकार देत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

Wardha Crime News
Palghar News: बोईसरमध्ये ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; नराधमाने दिली जीवे मारण्याची धमकी

मात्र, संतापलेल्या तुषारने तरुणीच्या कानशिलात लगावून जबरदस्ती करून तिचा मोबाइल जमिनीवर फोडला. शिवीगाळ करीत असताना त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला; मात्र, तुषारने तू माझ्यासोबत लग्न न केल्यास तुझ्या घरच्यांना जिवे मारेल आणि स्वत:च्या जिवाचे कमी-जास्त करून तुम्हा सर्वांना फसवील, अशी धमकी देऊन तेथून पळून गेला. याची माहिती तरुणीने तिच्या वडिलांना दिली. वडिलांनी थेट तरुणीला घेऊन तळेगाव पोलिस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. पुढील तपास तळेगाव पोलिस करीत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com