Wardha Crime News: धक्कादायक! पार्टी करण्यासाठी व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी; २४ तासात आरोपी अटकेत

Wardha Latest News: हा संपूर्ण सीसीटीव्हीत कैद झाला होता. यावरुन पोलिसांनी तपास करत आरोपीला २४ तासाच्या आत अटक केली आहे
Wardha Crime News
Wardha Crime NewsSaam tv
Published On

चेतन व्यास, प्रतिनिधी...

GunjKheda Crime News: पार्टी करायला तीन हजार रुपये दे, असे म्हणत चाकूचा धाक दाखवून व्यावसायिकांसह त्याच्या कुटुंबीयाला धमकाविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुलगाव पोलीस स्टेशन (Pulgaon Police Station) अंतर्गत गुंजखेडा गावात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती.

तक्रारीनुसार पोलिस निरीक्षक दारासिंग राजपूत यांनी तात्काळ तपासचक्रे फिरवून आरोपीला २४ तासांत अटक केली आहे. पवन कातरे (रा. पुलगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असल्याची माहिती पुलगाव पोलिसांनी दिली. (Crime News In Marathi)

Wardha Crime News
Chhatrapati Sambhajinagar News: लोकसभा लढवण्याची भुमरेंची औकात नाही, चंद्रकांत खैरेंचा पालकमंत्र्यांवर हल्लाबोल

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार संतोष रत्नाकर कोटगिरवार (५१, रा. गुंजखेडा) यांचा शीतपेय बनविण्याचा कारखाना आहे. ते कुटुंबासह कारखान्यात असताना आरोपी पवन कातरे याने मद्यधुंद अवस्थेत अनधिकृतपणे प्रवेश केला. यावेळी संतोष रत्नाकर यांनी त्यास हटकले असता पवनने संजय व त्याच्या कुटुंबीयाला चाकूचा धाक दाखवून मला पार्टी करण्यासाठी तीन हजार रुपये देण्याची मागणी केली. (Crime News)

तक्रादार संतोषने पैसे देण्यास नकार दिला असता पैसे न भेटल्यास तुला व कुटुंबीयाला चाकूने मारण्याची धमकी पवनने दिली. तसेच कारखान्याच्या काउंटरवर ठेवलेले पैसे मोजण्याची मशीन फेकुन दहा हजारांचे नुकसान करून तेथून पळ काढला. (Wardha News)

Wardha Crime News
Sharad Pawar News: राज्यात धार्मिक दंगली जाणीवपूर्वक घडवल्या जात आहेत; शरद पवार गंभीर आरोप

याबाबतची तक्रार संतोषने पुलगाव पोलिसांत दाखल केली होती. आरोपी पवन कातरे याने कारखान्यात प्रवेश करुन चाकूचा धाक दाखविल्याचे चित्र सीसीटीव्हीत कैद झाले होते. यावरुन पोलिसांनी तपास करत आरोपीला २४ तासाच्या आत अटक केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com