प्रेमविवाह केलेल्या दांपत्याच्या प्रेमाला संशयाची लागण; पतीने केली पत्नीची हत्या!

इम्रान जलालुद्दीन खान याने पत्नीला दगडाने ठेचून जिवानिशी ठार केले
प्रेमविवाह केलेल्या दांपत्याच्या प्रेमाला संशयाची बाधा; पतीने केली पत्नीची हत्या!
प्रेमविवाह केलेल्या दांपत्याच्या प्रेमाला संशयाची बाधा; पतीने केली पत्नीची हत्या!SaamTvNews

वर्धा : प्रेमविवाह केलेल्या दांपत्याच्या प्रेमाला संशयाची बाधा झाली आणि त्यातून दुर्दैवी घटना घडली. वर्ध्यातील (Wardha) भुगाव रोडवरील लॉईडस स्टील कंपनी परिसरात चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Wardha Bhugaon Road Murder Latest News)

हे देखील पहा :

चारित्र्याच्या संशयावरून या पती-पत्नीमध्ये नेहमीच वाद व्हायचा. मात्र, आज या वादाने अचानक उग्ररूप धारण केले. घरात चाललेला वाद अंगणात पोहोचला आणि बघता बघता इम्रान जलालुद्दीन खान (वय 25) याने आपली पत्नी कैकशा इम्रान खान (वय 20) हिला दगडाने ठेचून जिवानिशी ठार (Murder) केले. हि घटना संध्याकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली.

प्रेमविवाह केलेल्या दांपत्याच्या प्रेमाला संशयाची बाधा; पतीने केली पत्नीची हत्या!
Raj Thackeray : माझ्यावर १००च्या वर केसेस; भोंग्यासाठी अजून केस अंगावर घेऊ

घटनेची माहिती मिळताच तात्काळ सावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस (Police) निरीक्षक धनाजी जळक आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. मृतकाचे शव पोस्टमार्टम साठी सामान्य रुग्णालय वर्धा येथे पाठविण्यात आले असून आरोपी इम्रान खान याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com