Amravati: 'देव तारी त्याला कोण मारी' अख्खं घर उध्वस्त झालं, पण अलार्मने दिलं जीवनदान

Wall collapsed in Amravati: अलार्ममुळे त्यांची झोप उघडली आणि अलार्म बंद केल्यानंतर त्यांना दिसले की, भिंतीचा काही भाग पडत आहे.
Wall collapsed in Amravati
Wall collapsed in Amravatiअमर घटारे
Published On

अमर घटारे

अमरावती: अमरावती जिल्ह्यात (Amravati) गेल्या ४ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील कवठा कडू येथे सततच्या पावसामुळे (Heavy Rain) एक घर जमीनदोस्त झाले आहे. चुकीने लागलेला अलार्म (Alarm) वाजल्यामुळे कुटुंबाचा जीव वाचला आहे. 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय या कुटुंबाला आला आहे. (Amravati Latest News)

Wall collapsed in Amravati
शिंदेंचे नाव बदलून श्रीमान 'खापरफोडे' ठेवायला हवे; वेदांता फॉक्सकॉन प्रकरणी सामनातून हल्लाबोल

सारंगधर शामराव लांजेवार आणि त्यांची पत्नी हे दोघे चांदूर रेल्वे तालुक्यातील कवठा कडू येथील एका कुटुंबात राहतात. त्यांचे दोन खोल्यांचे टीन - मातीचे घर आहे. त्यांची लग्न झालेली २५ वर्षीय मुलगी व जावई हे ५ महिन्याच्या मुलीसह गावात आले होते. जेवण झाल्यानंतर सर्व सदस्य झोपी गेले होते. दोन ते तीन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे त्यांच्या घराची भिंत (Wall) जीर्ण झाली होती.

अशातच झोपल्यानंतर मध्यरात्री १.३० वाजताच्या दरम्यान त्यांच्या जावईचा अलार्म वाजला. मात्र तो अलार्म चुकीने लागला होता. अलार्ममुळे त्यांची झोप उघडली आणि अलार्म बंद केल्यानंतर त्यांना दिसले की, भिंतीचा काही भाग पडत आहे. यानंतर त्यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांना हाक मारली आणि उठवून लगेच सर्वांना घराबाहेर काढले.

Wall collapsed in Amravati
Bhandara: पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू; मृतदेहाचा शोध अद्यापही सुरुच

यानंतर अवघ्या पंधरा-वीस मिनिटातच ते ज्या खोलीत झोपले होते ती खोली पूर्णतः जमीन दोस्त झाली. यामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र त्यांचे घर पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे. चुकीने लागून वाजलेल्या अलार्ममुळे सदर कुटुंब बचावले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com