स्मशानभूमीत मुलीची पूजा; व्हिडिओ व्हायरल हाेताच मांत्रिक पसार

black magic
black magic
Published On: 

सातारा : सुरूर येथील अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत पुजण्याचा धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यात घडल्याने एकच खळबळ माजली आहे. दरम्यान हा प्रकार युवकांच्या निदर्शनास येताच मांत्रिकासह अल्पवयीन मुलगी आणि तिचे नातेवाईक बेपत्ता झाले आहेत. wai-superstition-surur-minor-girl-performed-balck-magic-pooja-cemetery-satara-sml80

black magic
पश्चिम महाराष्ट्रासह कोकणसाठी 100 कोटींचा निधी : नितीन गडकरी

वाई तालुक्यातील सुरूर गावाच्या स्मशानभूमीतील कट्ट्यावर मुलीच्या मांडीवर कोंबडा देऊन मांत्रिकाने पूजन केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समाेर आला आहे. यावेळी तेथे विचारणासाठी गेलेल्या युवकांनी काही नाही तिला त्रास हाेत हाेता म्हणून हे करीत आहे. फक्त काेंबडा मारुन नेणार आहाेत असे सांगताना दिसताहेत.

हा प्रकार युवकांच्या निदर्शनास येताच मांत्रिकासह अल्पवयीन मुलगी आणि तिचे नातेवाईक बेपत्ता झाले आहेत. अल्पवयीन मुलीच्या स्मशानभूमीत पुजनामुळे अनेक चर्चेला उधाण आले आहे. वाई तालुक्यातील सुरूर गावाच्या स्मशानभूमीतील घटनेवर अंधश्रद्धा निमुर्लनचे कार्यकर्ते काय करणार याची देखील चर्चा सुरु आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com