२ हजार घेताना पाेलिस ठाण्याशेजारीच रमेश काेळीला ACB ने धरले

 bribe
bribe

सातारा : वाई शहरातील हाॅटेल राजेशाही येथे २ हजार रुपयांची लाच bribe घेताना वाई पाेलिस ठाण्यातील सहायक फाैजदार रमेश काेळी यास लाचलुचपतच्या अधिका-यांनी पकडले. एसीबीने anti courrpution bureau ही कारवाई पाेलिस ठाण्याच्या शेजारीच केल्याने शहरात एकच खळबळ उडाली. wai-police-officer-trapped-in-anti-courrpution-bureau-satara-breaking-news-sml80

एसीबीकडे रमेश झिपा काेळी याच्याबाबत तक्रार प्राप्त झाली हाेती. त्याने एकास दाखल असलेल्या गुन्ह्यात ठाेस कारवाई करीत नाही त्यासाठी ४ हजार रुपये मागितले. त्यानंतर तक्रारदाराने २ हजार देऊ केले. त्यानूसार एसबीने वाई पाेलिस ठाण्याशेजारी असलेल्या हाॅटेल राजेशाहीत सापळा रचला आणि काेळीला लाचेचे पैसे घेताना रंगेहाथ पकडले

 bribe
Live वाशिम : शिवसेना, राष्ट्रवादी, काॅंग्रेसह जनविकासची आघाडी

एसबीने दिलेल्या माहितीनूसार रमेश झिपा कोळी (वय -५७ वर्षे) पद ASI वाई पोलीस स्टेशन, सध्या राहणार सह्याद्रीनगर, कृष्णाई हौसिंग सोसायटी, स्वप्नशिल अपार्टमेंट, यशवंतनगर ग्रामपंचायत, वाई मुळ गाव अमळथे, ता. सिंधखेडा, जि. धुळे याच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.

हा सापळा पोलीस निरीक्षक व्ही.व्ही. गिरी,, पो.ना.राजे, खरात, पो.कॉ.काटकर यांनी लावला. या पथकास राजेश बनसोडे (पोलीस अधीक्षक), सुहास नाडगौडा (अपर पोलीस अधीक्षक), अशोक शिर्के (पोलीस उपअधीक्षक) यांचे मार्गदर्शन लाभले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com