Vitthal Maharaj Shastri Prediction : देवेंद्र फडणवीस होणार पुन्हा मुख्यमंत्री! विठ्ठल महाराज शास्त्री यांची मोठी भविष्याणी

Devendra Fadnavis : गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांनी देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होतील, अशी भविष्यवाणी केली आहे. गहिनीनाथ गडाच्या पालखी सोहळ्याप्रसंगी माध्यमांशी बोलत होते.
Vitthal Maharaj Shastri Prediction
Vitthal Maharaj Shastri PredictionSaam Digital

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील, अशी भविष्यवाणी गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांनी केली आहे. ते गहिनीनाथ गडाच्या पालखी सोहळ्याप्रसंगी माध्यमांशी बोलत होते. शिवसेनेची युती तुटल्यानंतर सर्वाधिक जागी येऊनही २०१९ मध्ये भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, ही घोषणा खूप गाजली होती. दरम्यान या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांचं हे स्वप्न पूर्ण होणार का हे पहावं लागणार आहे.

Vitthal Maharaj Shastri Prediction
Manoj Jarange Patil : भुजबळांच्या आडून दंगली घडवण्याचा डाव; मनोज जरांगेंचे पुन्हा गंभीर आरोप

गहिनी प्रसादे निवृत्ती दातार । ज्ञानदेवा सार चोजविले।। या संत ज्ञानेश्वराच्या हरिपाठातील अभंगाप्रमाणे वारकरी संप्रदायाचे मुळपुरुष संत गहिनीनाथ यांच्या समाधीस्थळ असणाऱ्या, बीडच्या आष्टी तालुक्यातील गहिनीनाथ गडावरुन दिंडीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान झाले. संत वामन भाऊ महाराज यांनी या पालखीची सुरुवात सुमारे 130 वर्षापूर्वी केली असून आज देखील ही परंपरा सुरु आहे. या पालखी सोहळ्यामध्ये हजारो वारकरी सहभागी झालेले आहेत.

Vitthal Maharaj Shastri Prediction
Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग; या जिल्ह्यातील सर्व जागांचीही केली घोषणा? राज्यात किती जागा लढवणार?

वारकरी संप्रदायाचे मूळ नाथ संप्रदायात पाहायला मिळते. संत निवृत्तिनाथान अनुग्रह देनारे व संत ज्ञानेश्वराचे आजेगुरु गहिनीनाथ असल्याचा उल्लेख ग्रंथामध्ये आढळतो. बीड जिल्ह्यातील गर्भगिरी पर्वत रांगांमध्ये गहिनीनाथगड याठिकाणाहून गहिनीनाथांची पालखीचे प्रस्थान झालं. दरम्यान या पालखीमध्ये बीड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर येथील वारकरी सहभागी होतात. अतिशय शिस्त बद्ध आणि सर्व समावेशक असलेल्या दिंडीचे नियोजन या गडाचे महंत विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते. ऊसतोड कामगारांचा हा जिल्हा असल्याने दिंडीमध्ये महिला, ऊसतोडणी कामगार यांची संख्या अधिक आहे..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com