Manoj Jarange Patil : भुजबळांच्या आडून दंगली घडवण्याचा डाव; मनोज जरांगेंचे पुन्हा गंभीर आरोप

Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून मनोज जरांगें पाटील यांनी आज मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. हिंगोलीतून त्यांनी आज मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीला सुरुवात केली..
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSaam Digital

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. त्यांच्या मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीला हिंगोलीतून सुरुवात झाली. यावेळी त्यांनी पुन्हा एखादा मंत्री छगन भुजबळ यांना लक्ष केलं. जातींमध्ये तेढ वाढवून छगन भुजबळ यांचा दंगल घडवण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप जरांगें यांनी केला आहे. पण हा डाव कधीच यशस्वी होऊ देणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

कृपया एकमेकांच्या अंगावर जाऊ नका, हात जोडून विनंती. छगन भुजबळ यांचा दंगल घडविण्याच्या डाव पण मी कधीच यशवी होऊ देणार नाही. मी वेडा माणूस, छगन भुजबळ हुशार, तरी देखील मी मराठा मसाजाला आरक्षण मिळवून देणार आहे. तर आरक्षण दिलं नाही तर विधानसभेत किमान २०० ठिकाणी तरी सुपडा साफ करू. सरकारने आमच्या विरोधात अभ्यासक उतरवले आहेत. सरकारने १६ टक्के आरक्षण दिले टिकलं नाही. १३ टक्के दिलं ते पण टिकू दिलं नाही, आता १० टक्के आरक्षण दिलं, पण लागू होण्याआधीच याचिका दाखल केली आहे, मराठ्यांचे आरक्षण टिकू न देण्याचा हा डाव आहे.

छगन भुजबळ यांचे ऐकून मराठ्यांना विरोध कराल तर २८८ पैकी एक ही जागा सरकारमधील पक्षांची निवडून येऊ देणार नाही. सरकारने शहाणपणाची भूमिका घेऊन आरक्षण द्यावं. छगन भुजबळ यांचे ऐकून विरोध कराल तर लोकसभा निवडणुकीत जे झालं पुन्हा तसं नाही. एक मंत्री मला म्हणाले पाडा शब्द वापरू नका, काळजात धस्कन् होतंय. पण मराठ्यांचा एकच उद्देश आहे, आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे. राजकारणावरून आम्हाला काही देणंघेणं नसल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलं.

Manoj Jarange Patil
Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग; या जिल्ह्यातील सर्व जागांचीही केली घोषणा? राज्यात किती जागा लढवणार?

मराठा आणि कुणबी ऐकच आहेत, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. सगे सोयरे व्याख्या आम्ही जी दिली ती मान्य करायची आणि टिकवायची पण जबाबदारी सरकारची आहे.हैद्राबाद गॅझेट लागू करा. कुणबी मराठ्यांची पोट जात मराठा आहे मग आरक्षण का नाही. आतापर्यंत ५७ लाख नोंदी सापडल्या आहेत सरकारने लेखी दिलंय ,तरी पण आम्हाला आरक्षण देत नाही. मंडल आयोगाच्या चुका काढल्या आणि लगेच मराठ्यांचा नोकरी मधील टक्का वाढवा. मराठ्यांच्या नोकदराला बढती मिळत नाही.

सरकारला छगन भुजबळ यांची गरज असेल तर पर्याय नाही. पण छगन भुजबळ यांनी बोलण्यासाठी टोळी तयार केली आहे. पण मराठ्यांचा संयम सुटला तर विधानसभेत झटका बसेल. छगन भुजबळ खोडसाळ माणूस, त्यांनीच आमच्या गावात हाके यांना आणून बसवलं आहे आणि म्हणतात जातीय तेढ निर्माण करू नका. ओबीसी आणि मराठा बांधवांना विनंती आहे, कृपया एकमेकांच्या अंगावर जाऊ नका, हा दंगली घडवण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

Manoj Jarange Patil
Nanded Breaking News : टिप्परच्या धडकेत रिक्षाचा चुराडा; एक ठार, ७ गंभीर जखमी, ५ मुक्या प्राण्यांचाही गेला जीव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com