Sangli Crime News : सांगली जिल्ह्यातील विटा येथे बांधकाम साहित्य चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी विटा पाेलिसांनी (police) तिघा संशयित आरोपींना अटक केली आहे. विटा पोलिसांच्या अंतर्गत खानापूर (khanapur) पाेलिसांनीही ही धडक कारवाई केली असून त्यांच्याकडून तब्बल चार लाख 85 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
खानापूर तालुक्यातील सुलतानगादे येथील नेताजी केशव जाधव यांनी 23 ऑगस्ट रोजी विटा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. नितिन हणमंत वायदंडे (तालुका कवठेमहांकाळ ढालेवाडी), संतोष मारुती देशमुख (तालुका तासगाव, सावळज), अशोक नामदेव चौगुले (तालुका कवठेमहांकाळ, हिगणगाव) सध्या राहणार तासगाव तालुक्यातील सावळज अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
या तिघांकडून पाेलिसांनी 59 हजार 500 रुपये किमतीच्या स्लॅबसाठी वापरण्यात येणाऱ्या 191 लोखंडी पञ्याच्या प्लेटा, दहा हजार रुपये किमतीची निळ्या रंगाची वेल्डींग मशीन, दहा हजार रुपये किमतीचे हिरव्या रंगाचे पाने, तीन हजार रुपये किमतीचा स्पीकर, तीन हजार रुपयांची ग्रायडींग मशीन आणि चार लाख रुपयांची महिंद्रा पिकअप गाडी असा एकूण चार लाख 85 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधित संशयित आरोपींची कसून चौकशी पोलिस करत आहेत. या तिघांकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.