Vishalgad Encroachment: विशाळगड परिसरात तोडफोड प्रकरण, संभाजीराजे छत्रपतींसह ६० जणांविरोधात गुन्हा

Sambhaji Raje Chhatrapati: विशाळगड परिसरात तोडफोड प्रकरणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहूवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
Vishalgad Encroachment: विशाळगड परिसरात तोडफोड प्रकरण, संभाजीराजे छत्रपतींसह ६० जणांविरोधात गुन्हा
Vishalgad EncroachmentSaam Tv
Published On

रणजीत माजगावकर, कोल्हापूर

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील विशाळगड (Vishalgad Encroachment) परिसरात तोडफोड केल्याप्रकरणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर जमाव जमवणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, बंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे याप्रकरणी या सर्वजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेगवेगळ्या १० पेक्षा अधिक कलमांतर्गत शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाळगड परिसरात रविवारी काही घरांची वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी आता कारवाईला सुरूवात केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी संभाजीराजे छत्रपतींसह ६० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत पोलिसांनी २१ जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये कोल्हापूरसह इचलकरंजीतील अनेक जणांचा समावेश आहे. अजूनही काहींना ताब्यात घेण्यात येणार अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Vishalgad Encroachment: विशाळगड परिसरात तोडफोड प्रकरण, संभाजीराजे छत्रपतींसह ६० जणांविरोधात गुन्हा
Kolhapur: विशाळगडावरील अतिक्रमण प्रकरण; संभाजीराजे छत्रपतींवर गुन्हा दाखल,मोठी प्रतिक्रिया...

विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सहा पथकं विशाळगडच्या दिशेने रवाना झाली आहे. पीडब्ल्यूडीच्या विविध कंत्राटदारांमार्फत विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी पथक रवाना झाली आहेत. काही वेळामध्येच गडावरील अतिक्रमण हटवण्यास सुरूवात होणार आहे.

Vishalgad Encroachment: विशाळगड परिसरात तोडफोड प्रकरण, संभाजीराजे छत्रपतींसह ६० जणांविरोधात गुन्हा
Vishalgad Encroachment: सरकार ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत गडावरून हलणार नाही, संभाजी राजे छत्रपतींचा आक्रमक पवित्रा

दरम्यान, विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहे. त्यांनी रविवारी 'चलो विशाळगडचा नारा' दिला होता. शिवभक्तांसह ते विशाळगडावर गेले होते. अज्ञातांनी विशाळगडच्या पायथ्याला असणाऱ्या काही गावांमध्ये धुडगूस घातला. यावेळी काही अज्ञातांनी स्थानिकांवर हल्ला केला होता. त्यांच्यावर दगडफेक केली, घरांची तोडफोड केली तसंच वाहनांची देखील तोडफोड केली होती. या दगडफेकीमध्ये अनेक गावकरी जखमी झाले होते. यामुळे या अतिक्रमण मोहिमेला हिंसक वळण आले होते. याचे धक्कादायक व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते.

Vishalgad Encroachment: विशाळगड परिसरात तोडफोड प्रकरण, संभाजीराजे छत्रपतींसह ६० जणांविरोधात गुन्हा
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात 29 जुलैपर्यंत बंदी आदेश; नेमकं काय आहे प्रकरण?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com