Vishalgad Encroachment: गुन्हा दाखल झाला असेल तर मला त्वरित अटक करा; संभाजीराजे आक्रमक

Sambhaji Raje: विशाळगड परिसरात तोडफोड केल्याप्रकरणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींविरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान संभाजीराजे छत्रपती शाहूवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेत.
Vishalgad Encroachment: गुन्हा दाखल झाला असेल तर मला त्वरित अटक करा; संभाजीराजे आक्रमक
Sambhaji Raje Chhatrapati On Vishalgad EncroachmentSaam Tv संग्रहित छायाचित्र
Published On

रणजीत माजगावकर, साम प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगड अतिक्रमण मुक्तीचा प्रश्न चांगलाच चिघळलाय. विशाळगड परिसरात तोडफोड केल्याप्रकरणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावरून संभाजीराजे छत्रपती चांगलेच संतापले असून ते हे शाहूवाडी पोलीस ठाण्यात हजर झालेत.

कोल्हापुरात विशाळगडावरून राजकारण तापलंय. एकीकडे सरकारने अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिलेत. दुसरीकडे या कामाविरुद्ध मुस्लिम समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. विशाळगडाच्या पायथ्याला झालेल्या तोडफोडीवरून मुस्लिम समाजाने तीव्र निदर्शने केली. गजापूर येथे काल झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांना अटक करा, अशी मागणी देखील मुस्लीम बांधवांनी केलीय.

तोडफोडी झाल्याप्रकरणी गु्न्हा दाखल झाल्यानंतर संभाजी राजे छत्रपती शाहूवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेत. माझ्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर आत्ता मला त्वरित अटक करा, अन्यथा मी इथून उठणार नाही,असा आक्रमक पवित्रा संभाजीराजे छत्रपती यांनी घेतलाय. दरम्यान अतिक्रमण हटवण्यासंदर्भात सरकारने निर्णय घेतल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी साम टीव्हीशी संवाद साधलाय. विशाळगडाच्या अतिक्रमणासंदर्भात राज्य सरकारने अगोदरच निर्णय घेतला असता तर ही वेळ आली नसती.

राज्य सरकारने आणि राज्यकर्त्यांनी शिवभक्तांचा अंत पाहिल्याने शिवभक्त विशाळगडाच्या पायथ्याला जमले. कोणत्याही परिस्थितीत विशाळगड अतिक्रमण मुक्त झाला पाहिजे अशी आमची पहिल्यापासून भावना आहे. मुख्यमंत्र्यांनी त्वरित विशाळ गडावरील अतिक्रमणा संदर्भात दखल घेऊन कारवाई सुरू केली असल्याचं संभाजी राजे छत्रपती यांनी साम टीव्ही सोबत बोलतांना सांगितलं आहे.

तोडफोड झाल्यावरून त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुमारे ५०० हून अधिक शिवप्रेमींविरोधात गुन्हे दाखल केलेत. तसेच काहींची धरपकडही केली. पोलीस आणि प्रशासनाकडून झालेल्या या कारवाईविरोधात युवराज संभाजीराजे छत्रपतींनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. सोशल मीडियावरून दिलेल्या प्रतिक्रियेत संभाजीराजे छत्रपती म्हणाले, काल विशाळगड येथे झालेल्या प्रकरणानंतर पोलिसांनी शिवभक्तांची धरपकड सुरू केलीय.

शिवभक्तांवर गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. प्रशासन स्वतःच्या चुकीवर पडदा टाकण्यासाठी आणि स्वतःचा बेजबाबदारपणा लपविण्यासाठी जाणीवपूर्वक शिवभक्तांना लक्ष्य करत आहे. मी सर्व शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा असून मी स्वतः शाहूवाडी पोलीस स्टेशन येथे हजर होण्यास जात आहे. सर्वांनी संयम बाळगावा व कायद्याचा सन्मान राखावा, असं आवाहनही संभाजीराजे छत्रपती यांनी पोलीस स्टेशनमध्ये दाखल होण्याआधी त्यांनी केलं होतं.

Vishalgad Encroachment: गुन्हा दाखल झाला असेल तर मला त्वरित अटक करा; संभाजीराजे आक्रमक
Vishalgad News Today : संभाजीराजे छत्रपती यांना अटक करा; 'विशाळगडा'वरून राजकारण तापलं, आंदोलकांची तीव्र निर्देशने

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com