'अंगात आलंय' विधीच्या नावाखाली भोंदूबाबानं थेट लॉजवर नेलं; अब्रुचे लचके तोडले.. विरार हादरलं

Virar Crime News: भूत उतरविण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भोंदूबाबासह अल्पवयीन मुलीच्या मित्राला ताब्येत घेतलं आहे.
Virar Crime news
Virar Crime newsSaam Tv News
Published On
Summary
  • भूत उतरविण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर बलात्कार.

  • भोंदूबाबानं मुलीला थेट लॉजमध्ये नेलं.

  • पोलिसांनी तपास करून भोंदूबाबानं तरूणीच्या मित्राला ताब्यात घेतलं.

विरारमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भूत उतरविण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेच्या दिवशी पीडित मुलगी जीवदानी मंदिरात दर्शनासाठी गेली होती. मात्र, तिच्या अंगात आल्याचं सांगत पीडितेला भोंदू बाबाकडे नेण्यात आले. मात्र, भोंदूबाबानं विधीच्या नावाखाली पीडितेवर जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी तपास करीत भोंदूबाबा विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषणाच्या घटनांच्या मालिकेत विरारमधील आणखी एका घटनेची भर पडली आहे. घटनेच्या दिवशी पीडित अल्पवयीन मुलगी जीवदनी मंदिरात दर्शनासाठी गेली होती. त्यावेळी तिच्या अंगात आल्याचं म्हटलं जात आहे. तिच्या अंगात आल्याचं पाहून तिच्या मित्रानं तिला एका बाबाकडे नेलं.

Virar Crime news
कोल्हापूर स्पेशल! CSMT ते कोल्हापूर दरम्यानचा प्रवास होणार अतिजलद; जाणून घ्या किती असेल रेल्वे तिकीट, अन् थांबे

भोंदूबाबानं अल्पवयीन मुलीला पाहिलं. तिच्या अंगातील भूत उतरवण्यासाठी एक विधी करावा लागेल, असं सांगितलं. विधी पूर्ण करण्यासाठी भोंदू बाबाने तिला दुचाकीवरून थेट राजोडी बीचवर नेले. तेथे अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्ती केली. तसेच लैंगिक अत्याचार केला. बलात्कार करून सोडून दिलं.

Virar Crime news
लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, गर्लफ्रेंडवर चाकूने सपासप वार; नागपूर हादरले

या संतापजनक घटनेची माहिती पोलिसांनी कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. तपासात भोंदूबाबानं अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार केल्याचं उघडकीस झालं. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात भोंदूबाबसह मित्रावर बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी चार तासातच अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com