Viral Video : "आम्ही डॉनच्या पोरी..." छत्रपती संभाजीनगरमधील मद्यधुंद तरुणींचा व्हिडीओ व्हायरल

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज महावीर चौकातील मद्यधुंद अवस्थेत भररस्त्यात राडा घालणाऱ्या तरुणींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Chhatrapati Sambhajinagar
viral video aurangabad saam tv
Published On

माधव सावरगावे, छत्रपती संभाजीनगर

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकी "आम्ही लोखंडे डॉनच्या पोरी आहे, पोलीस आम्हाला पकडू शकत नाही." असं म्हणणाऱ्या काही तरुणींचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. ही घटना वाळूज येथील महावीर चौकात घडली असून या मुली मद्यधुंद अवस्थेत असल्याचं समोर आलं आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळख असलेल्या समर्थ नगर येथील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात मद्यधुंद अवस्थेत 3 महिलांनी चेंगळ्या बोले कुहू म्हणत गोंधळ घालणाऱ्या महिलांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ही घटना ताजी असताना आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शहरातील वाळूज येथील महावीर चौकात हा व्हिडिओ आहे, ज्यात मद्यधुंद अवस्थेत दोन तरुणी रस्त्यावर गोंधळ घालत रस्त्याच्या मधोमध नागरिकांना शिवीगाळ करत आहेत.

Chhatrapati Sambhajinagar
Dyslipidemia : कोलेस्ट्रॉल वाढूनही लक्षणं दिसत नाहीयेत? हृदयासाठी धोकादायक ठरणाऱ्या 'या' समस्येवर काय उपाय, डॉक्टरांनी दिली माहिती

नागरिकांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.यावेळी "यांना माहित नाही आम्ही कोण आहे. त्यांना वाटत असेल आपण पेल विल आहे.पण आम्ही आमच्या टेंशन मध्ये पिलो.आम्ही लोखंडे डॉनच्या पोरी डायरेक काय? कोणतपण पोलीस आम्हाला पकडू शकत नाही.मी टेंशनमुळे पिले फक्त आज असं म्हणत गोंधळ घातला.एवढेच नाही तर माझा भाऊ इथला डॉन आहे.हाफ मर्डर,फुल मर्डर करतो तो. मी गाड्या पण अडवल्या तर मला पोलीस काही करू शकत नाही." मी लय मोठ्या फॅमिलीतली असल्याचा देखील ही तरुणी बोलत होती. या घटनेनंतर स्थानिक नागरिक तरुणींना समजवत असताना त्यातील एका तरुणीने चप्पल काढत मारू का असं म्हटले.

यावेळी नागरिक तिथून निघाले.मद्यधुंद अवस्थेतील तरुणी रस्त्याने पायी जात असल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यामुळे नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी पुढील कारवाई पोलीस करीत आहेत.

Chhatrapati Sambhajinagar
Pandharpur Tourism: पंढरपूरला जाताय? यमाई तलावाजवळचं तुळशी वृंदावनला नक्की भेट द्या!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com