Tanvi Pol
पंढरपूर हे महाराष्ट्रातील एक अत्यंत पवित्र आणि भक्तिरसाने न्हालेलं स्थान आहे.
विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक इथं गर्दी करतात आणि सध्या आषाढी वारीमुळे भाविकांची मोठी गर्दी पंढरपुरला होत आहे.
पण फक्त मंदिर दर्शन पुरेसं नाही, कारण पंढरपूरचं सौंदर्य, श्रद्धा आणि अध्यात्म इतर अनेक ठिकाणी विखुरलेलं आहे.
असंच एक खास ठिकाण म्हणजे यमाई तलावाच्या काठावर वसलेलं तुळशी वृंदावन.
पंढरपूरातील यमाई तलाव हा फार जुना तलावांपैकी एक आहे.
तलावाजवळचं शांत वातावरण, पाण्याचा नाद आणि निसर्गाचं सौंदर्य मनाला प्रसन्नता देतं.
जर तुम्ही पंढरपूरात आलात तर केवळ मंदिर बघून परतू नका तर हे स्थानही नक्की पाहा.