Farmer Video: महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा व्हिडिओ बघून दिल्लीचं हृदय पाघळलं, केंद्रीय कृषिमंत्र्यांचा थेट बळीराजाला फोन

Unseasonal Rain: सध्या राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अशातच काल एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला. याची दखल थेट केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घेतली आहे.
Washim news
Washim news saam tv
Published On

मनोज जयस्वाल, साम टीव्ही

वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथील कृषि उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी भुईमूग घेऊन आलेल्या शेतकरी गौरव पवार यांचे संपूर्ण पीक मुसळधार पावसात वाहून गेले होते. आपले पीक वाचवण्यासाठी तो कशी धडपड करत होता याचा व्हिडिओ काल सोशल मीडियावर व्हायरल होत होता. हा व्हिडिओ पाहून अनेकजन हे भावुक झाले होते.

Washim news
शिवरायांनी जसा अफजलखानाचा कोथळा काढला, तसा PM मोदी पाकिस्तानचा कोथळा काढणार - रामदास आठवले

शेतकऱ्याचे जीवन किती अवघड आहे याची प्रचिती नेहमीच येत असते. अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ, किटकांचा प्रादुर्भाव अशा अनेक अडचणींचा सामना या जगाच्या पोशिंद्याला करावा लागत असतो. शेत नांगरण्यापासून तर शेतमाल विकेपर्यंत त्याला जिवाची कासावीस करावी लागते. इतके करून देखील त्याच्या मालाला कवडी मोल भाव मिळत असतो. अशातच सध्या राज्यात अवकाळीचे सावट आहे. संपूर्ण महाराष्ट्रात जोराचा पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकारी हवालदिल झाला असून मोठ्या संकटाचा सामना तो करत आहे.

Washim news
Solapur Crime : बस स्टँडवरुन ३ वर्षीय चिमुकलीला पळवलं, दागिने काढून काही अंतरावर सोडलं; 'तो' धागा महत्त्वाचा ठरला

अशीच काहीशी घटना काल वाशिम जिल्ह्यात घडली. वाशिम जिल्ह्याला अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. याच अवकाळी पावसात एका शेतकऱ्याच्या भुईमुगाच्या शेंगा पाण्यात वाहून गेल्या. उन्हाच्या तडाख्यात मोठ्या कष्टाने पिकवलेल्या शेंगा वाचवण्यासाठी त्याची धडपड सुरू होती. पण पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की त्याच्या डोळ्यासमोर त्याने पिकवलेल पीक वाहून जात होतं. पण त्याला काहीच करता आलं नाही. हा मन हेलावून टाकणार व्हिडिओ बघून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणले. हे पाहिल्यावर वाटते की अशी वेळ जगाच्या पोशिंद्यावर कधीही येऊ नये.

Washim news
Beed Crime : तुझा संतोष देशमुख पार्ट टू करू...! बीडमध्ये पुन्हा गुंडाराज, परळीत मारहाण झालेल्या तरुणाने सांगितली आपबिती

हा व्हिडिओ माध्यमांनी दाखवल्यानंतर त्याची दखल थेट देशाच्या कृषिमंत्र्यांनी घेतली.

सदर घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर माध्यमांनी ही त्याची दखल घेतली आणि आज केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी थेट दिल्लीहून वाशिम जिल्हा प्रशासनाची संपर्क साधला, आणि त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले. या शेतकऱ्याचे नाव गौरव पवार असे आहे.

मानोरा कृषि उत्पन्न बाजार समितीने गौरव पवार यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. आज गौरव यांना बाजार समितीकडून मदत दिली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com