Vinod Patil : CM शिंदेंच्या भेटीनंतर विनोद पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Vinod Patil reaction after cm eknath shinde meet : या लोकसभा मतदारसंघात कुणाला पाठिंबा जाहीर करायचा, या बाबतचा राजकीय निर्णय मी लवकरच जाहीर करेल, अशी प्रतिक्रिया विनोद पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर दिली.
Vinod Patil : CM शिंदेंच्या भेटीनंतर विनोद पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Vinod Patil reaction after cm eknath shinde meet Saam Tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभेविषयी मोठं भाष्य केलं. 'निवडणुकीविषयी सहकाऱ्यांशी चर्चा करत आहे. या लोकसभा मतदारसंघात कुणाला पाठिंबा जाहीर करायचा, या बाबतचा राजकीय निर्णय मी लवकरच जाहीर करेल,अशी प्रतिक्रिया विनोद पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर दिली.

Vinod Patil : CM शिंदेंच्या भेटीनंतर विनोद पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Sugar mills : मोठी बातमी! लोकसभा निवडणुकांआधीच राज्यातील २१ साखर कारखान्यांना मिळाली कर्जाची गॅरंटी

लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाकडून मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील इच्छुक होते. या लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाकडून अनेक नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. याचदरम्यान ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरै यांना उमेदवारी जाहीर झाली. तर काही दिवसांनी शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांचं नाव जाहीर करण्यात आलं.

यानंतर विनोद पाटील नाराज असल्याचे बोललं जात होतं. त्यांनी या लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उभे राहणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, काही दिवसांनी माघार घेणार असल्याचे जाहीर केले. आज गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये विनोद पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Vinod Patil : CM शिंदेंच्या भेटीनंतर विनोद पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Maval Lok Sabha : मावळ लोकसभा मतदार संघात तिरंगी लढत; वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज

मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले, 'आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनोद पाटील यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. दोघांत तब्बल ५० मिनिटे चर्चा झाली. यानंतर विनोद पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत मला उमेदवारी दिली नाही, त्यामुळे मी नाराज नाही'.

'मी काल जाहीर केलं मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. मला कुणाला पाडलं आणि कुणाला विजय केलं हा ठपका माझ्यावर लावून घ्यायचा नव्हता, म्हणून मी निवडणूक लढलेलो नाही. मी सध्या जिल्ह्याचा दौरा करीत आहे. माझ्या सहकाऱ्यांशी मी चर्चा करीत आहे. कुणाला पाठिंबा जाहीर करायचं हा राजकीय निर्णय मी लवकरच जाहीर करेल, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com