- सूर्यकांत पवार
कास (जि. सातारा) : कास पठार-सह्याद्रीनगर हा शिवकालीन मार्ग kass rajmarg खुला करण्यास कास पठार समितीने विरोध केला आहे. याबाबत समितीच्या सभेत ठराव घेण्यात आला आहे. कास पठार kass valley of flowers जागतिक वारसास्थळ यादीमध्ये आहे. ‘युनेस्को’चे Unesco नामांकन मिळाले आहे. नामांकन टिकवायचे असेल तर कास पठाराचे संवर्धन होणे गरजेचे आहे. कास पठार-सह्याद्रीनगर मार्ग खुला केल्यास या मार्गावर अनेक अवैध प्रकार सुरू होतील आणि त्यामुळे वनसंपत्तीला धोका निर्माण होऊ शकतो, शिकारीचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे हा मार्ग बंद आहे, तो तसाच राहावा, असा ठराव कास पठार कार्यकारी समितीच्या बैठकीत करण्यात आला. (villagers-opposess-to-reopen-kass-rajmarg-satara-trending-news)
या मार्गावर कुठली मानवी वस्ती नाही. सर्व आजूबाजूच्या गावांना जाण्यासाठी पर्यायी डांबरी रस्ते उपलब्ध आहेत. पठारावरील वनसंपदा टिकली तरच भविष्यात पर्यटन वाढणार आहे. वनसंपदा नष्ट झाली तर कास पठाराचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. त्यामुळे हा रस्ता बंद आहे. तो तसाच बंद ठेवून पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कास पठार कार्यकारी समितीने केले आहे.
पर्यटन विकास झाला पाहिजे, हे बरोबर आहे. परंतु, कास पठाराचा फक्त काही भागच पर्यटकांसाठी खुला आहे. अनेक हेक्टर परिसर आज निर्जन आहे, असे समितीचे सदस्य सोमनाथ जाधव यांनी नमूद केले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.