आपल्या अस्खलित मराठी भाषेच्या जोरावर आणि धारदार विचारांनी अल्पावधीत प्रसिद्धी मिळालेल्या विद्यानंद बापटांनी डीजे आणि ध्वनीप्रदूषणाला विरोध केला... आणि त्यांच्या डिजे विरोधी मराठी भाषेचा धसका घेतलेल्या कथित संस्कृतीरक्षकांनी बापटांवर भ्याड हल्ला केला. वाद्यांच्या अप्रमाणित गोगांटा विरोधी विचारांची लढाई शब्दांनी लढणाऱ्या बापटांना घेरून मारुन सुसंस्कृत पुण्यात गुंड किती उदंड झाले हे दिसलं पण तरीही बापटांनी थांबणार नसल्याचं सांगत आपल्या खास शैलीत या गुंडांची खिल्ली उडवलीय.
पोलिसांनी या तथाकथित संस्कृतीच्या रक्षकांवर कारवाई तर केली... पण बापटांनी या हल्ल्यानंतर मागे न हटता, अधिक आक्रमक होत लष्कर-ए-सण म्हणत डीजेसमर्थकांचे वाभाडे काढले, बापटांवर झालेल्या या भ्याड हल्ल्यानंतर आता पुणेकरांनी बापटांच्या समर्थनात रविवारी रस्तावर उतरण्याचं ठरवंलय.
विद्यानंद बापटांनी गेल्या अनेक वर्षांपासून होणाऱ्या संस्कृती धर्माच्या नावाने सर्रास होणाऱ्या ध्वनीप्रदुषणाचा मुद्दा मांडला, आणि त्यांना राज्यभरातून पाठिंबाही मिळू लागला. विरोधकांनीही बापटांना समर्थन दिलंय. तर बापटांच्या भाषेची मोहिनी पडलेल्या मुख्यमंत्र्यांनी देखिल त्यांच्या या अस्खलित मराठीचं कौतुक करत बापटांना जरा दमानं घेण्याचाही सल्ला दिला. आज सण-उत्सवांमध्ये डीजेचा वापर मर्यादेबाहेर गेलाय. मानवी शरीरासाठी ८५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज अत्यंत घातक असताना, डीजेचा दणदणाट थेट ११० ते १४० डेसिबलपर्यंत पोहोचतोय.. याच जीवघेण्या आवाजामुळे कुणाचा रक्तदाब वाढतोय, कुणाला हृदयविकाराचा झटका येतोय, तर अनेक ठिकाणी घरांच्या भिंतींना तडे जातायेत.
एवढं सगळं उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही, याविरोधात आवाज उठवायला रत्नागिरीतील बापटांसारख्या माणसालाच पुण्यात पुढे यावं लागतं. पण विचारांचा विरोध विचारांनी करण्याच्या सुसंस्कृत परंपरेला फाटा देऊन, विचारांचा विरोध हाणामारीनं करण्याची ही नवी गुंडसंस्कृती महाराष्ट्राला कोणत्या वळणावर घेऊन चाललीय? असा प्रश्न पडतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.