'मैं हूँ डॉन' गाण्यावर उदयसिंह राजपूत यांचा भन्नाट डान्स; व्हिडिओ व्हायरल

आमदार राजपूत यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Aurangabad News
Aurangabad NewsSaam Tv
Published On: 

औरंगाबाद - शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांनी बंड पुकारल्यानंतर शिंदे गटात सामील न होता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सोबत ठामपणे उभा राहणारे कन्नड मतदारसंघाचे शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. उदयसिंग राजपूत हे औरंगाबादच्या (Aurangabad) कन्नडचे आमदार आहेत. त्यातच आता राजपूत यांनी एका लग्नात मैं हूँ डॉन या गाण्यावर ठेका धरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहे.

काल त्यांनी एका लग्नात हजेरी लावली. वरात निघाल्यावर कार्यकर्त्यांनी आमदारांना डान्स करण्याचा आग्रह केला. तेव्हा डीजेवर मैं हूँ डॉन हे गाण सुरू होत. त्यावर आमदार राजपूत यांनी ठेका धरला. आमदार राजपूत यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हे देखील पाहा -

दरम्यान, आमदार राजपूत यांनी आपल्यला शिंदे गटात सहभागी होण्यासाठी 50 कोटींहून अधिकची ऑफर मिळाल्याचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. राजपूत यांच्या या माहितीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एवढंच नाही तर आपल्याकडे दोन चारचाकी भरुन पैसे आल्याचे फुटेजही असल्याचा दावा उदयसिंग राजपूत यांनी केला आहे. मात्र 100 कोटी दिले तरीही आपण गद्दारी करणार नाही, असे उदयसिंग राजपूत यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता शिवसेनेतल्या बंडाला एक नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.

Aurangabad News
Eknath Shinde : एकनाथ शिंदे गटासोबत सध्या किती आमदार? वाचा सविस्तर

शिवसेनेतील आमदारांच्या बंडामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी बंड केले आहे. शिंदे गटात जाणाऱ्या आमदारांची संख्या वाढतच आहे. काल मंत्री उदय सामंतही एकनाथ शिंदे गटात गेले. शिंदे गटात सध्या ४७ आमदार गेले असल्याचे बोलले जात आहे. यात शिवसेनेचे ३८ आणि अपक्ष ९ आमदार आहेत. यामुळे आता राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com