- ओंकार कदम / सचिन जाधव / राेहिदास गाडगे
दिवाळी निमित्त (diwali 2023) महानगरांतील चाकरमानी आपआपल्या गावाला जातात. त्यामुळे आज (शनिवार) पुन्हा एकदा माेठ्या संख्येने पुणे बंगळुरू महामार्गावर (pune bangalore national highway) वाहने धावत आहेत. परिणामी खंबाटकी घाटातील (khambatki ghat traffic update) वाहतुक मंदावली आहे. (Maharashtra News)
दिवाळी सणामुळे मुंबई, पुण्याहून (pune) कोल्हापूर (kolhapur), सातारा, सांगली (sangli) आणि कोकणात (kokan) जाणारी वाहनांची पुणे बंगळुरू महामार्गावर तोबा गर्दी उसळली आहे. त्यामुळे खंबाटकी घाटात वाहनांचा रांगा लागल्याचे पहायला मिळत आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
काही ठिकाणी घाटात वाहने बंद पडली आहेत. त्यांना बाजूला घेण्याचे काम सुरू आहे. सध्या या महामार्गावर वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. वाहतुक काेंडी साेडविण्यासाठी सातारा पोलीसांचे प्रयत्न सुरु आहेत परंतु वाहनांची संख्येमुळे ते अपुरे पडत आहेत.
दरम्यान पुणे नगर रोडवर वाहतूक कोंडी (pune nagar road traffic update) झाल्याचे सकाळपासून पाहायला मिळाले. दिवाळीनिमित्त पुण्याहून बाहेरगावी जाणाऱ्या वाहनांच्या रांगा नगर राेडवर दिसत आहेत. दोन दोन तास वाहने एकाच ठिकाणी उभी असल्याचे पाहयला मिळत आहे. दिवाळी सुट्टीला जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा माेठा त्रास जाणवत असल्याचे नमूद केले.
पुणे नाशिक महामार्गावर चाकण येथे वाहतूक कोंडी
- चाकण ते वाकी दरम्यान चार ते पाच किलोमीटर वाहनाच्या रांगा.
- दिवाळीच्या सलग सुट्ट्या आल्याने मोठी वाहतूक कोंडी.
- पुण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.