VIDEO: ७ जन्मच काय ७ सेकंदही आम्हाला बायको नको; वैतागलेल्या पुरुषांनी पिंपळाच्या झाडाला घातल्या १०८ उलट्या प्रदक्षिणा

Vat Purnima Festival 2024: वटपोर्णिमेच्या आधी छत्रपती संभाजीनगरमध्ये त्नी पीडित संघटनेच्या सदस्यांनी आणि पत्नीपीडित पतींनी पिंपळ पौर्णिमा साजरी करून ती पत्नी कधीच नको अशी प्रार्थना केली.
Vat Purnima Festival 2024:
Vat Purnima Festival 2024: Saamtv

छत्रपती संभाजीनगर|ता. १४ जून २०२४

उद्या वटपोर्णिमा! वटपोर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिला वटपौर्णिमेची पूजा करून वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात. जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात. मात्र वटपोर्णिमेच्या आधी छत्रपती संभाजीनगरमध्ये त्नी पीडित संघटनेच्या सदस्यांनी आणि पत्नीपीडित पतींनी पिंपळ पौर्णिमा साजरी करून ती पत्नी कधीच नको अशी प्रार्थना केली.

Vat Purnima Festival 2024:
Nashik Breaking News: मोठी बातमी! ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा कोकणेंच्या गाडीवर हल्ला, मोठा दगड टाकून काच फोडली

छत्रपती संभाजीनगर शहरात २०१७ पासून पत्नी पीडित संघटना ही राज्यभरातील पत्नीपीडित पतीसाठी काम करीत आहे. यासाठी वाळूज परिसरात पत्नी पीडितांच्या निवासासाठी पत्नी पीडित आश्रम सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी राज्यभरातून आतापर्यंत जवळपास नऊ हजार पत्नी पीडितांनी नोंदणी केली आहे. अनेक पीडित बायकोपासून सुटका व्हावी म्हणून न्यायालयीन लढा देत आहे. मात्र त्यांना न्याय मिळत नसून प्रचंड मानसिक त्रास सहन करावे लागत आहे.

त्यासाठी पत्नी पीडित आश्रमाच्या माध्यमातून मदत केली जात आहे. घरातून हाकलून दिलेले पुरुष या ठिकाणी राहतात. वटपौर्णिमेच्या दिवशी महिला वडाचे पूजन करून कुटुंबाची आणि पतीच्या आरोग्यासाठी देवाकडे साकडे घालतात. मात्र, हे जर खरे असेल तर वडाच्या ऐवजी पिंपळाची पूजा करून बायको पासून सुटका मिळावी म्हणून विनवणी करण्यासाठी हे पूजन करण्यात येत आहे.

Vat Purnima Festival 2024:
Ahmednagar Crime: जन्मदात्या आईचे सैतानी कृत्य! प्रेमात अडसर ठरणाऱ्या मुलांनाच संपवलं; प्रियकराच्या मदतीने शेततळ्यात बुडवून घेतला जीव

पिंपळ हे लग्न न झालेला व्यक्तीचे प्रतिक मानले जाते. मग आम्ही पिंपळाची 108 उलट्या प्रदक्षिणा घालून पूजा करून बायको पासून सुटका व्हावी अशी विनंवणी करतो, असे पत्नी पीडित पुरुषांनी सांगितले आहे.

काय आहेत या संघटनेच्या मागण्या?

  1. पुरुषांसाठी स्वतंत्र पुरुष आयोग बनवावा.

  2. एकतर्फी कायद्यावर बंदी आणावी

  3. पोलीस ठाण्यात पुरुष दक्षता समिती स्थापन करावी .

  4. जिल्हा स्तरावर पुरुष तक्रार निवारण केंद्र देखील स्थापन करावे .

  5. कौटुंबिक वाद माननीय न्यायालयात गेल्यास एका वर्षाच्या आत निकाली काढावे.

  6. अश्या मागण्या आहेत.

Vat Purnima Festival 2024:
Vijay Wadettiwar News: 'चुकीच्या धोरणामुळेंच तणावाची परिस्थिती', मराठा- ओबीसी वादावरुन विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com